Top News शिक्षण

येत्या 10 दिवसांत राज्यातील सर्व महाविद्यालयं सुरु करण्याबाबत निर्णय घेणार

मुंबई | राज्यात कोरोनाने थैमान घातलं होतं त्यावेळी सर्व महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली होती. अजूनही महाविद्यालय सुरु करण्यात आलेली नाहीत. दरम्यान 20 जानेवारीपर्यंत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणारे.

माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिलीये. उदय सामंत म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची खबरदारी घेऊन 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून 20 जानेवारीपर्यंत घेतला जाईल.”

शनिवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून उदय सामंत यांनी विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिलीये.

शिवाय प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना फटका बसत असल्याने प्रवेश प्रक्रियेस 15 जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असल्याचंही सामंत यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात नवरदेवाच्या बापानं चक्क मेव्हणीचेच दागिचे चोरले, अन् लग्नात…

‘आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा’; प्रकाश आंबेकरांची मागणी

सर्वात मोठा निकाल!! गुटखा विक्री करणाऱ्याला आता 10 वर्षे शिक्षा!

‘शेतकरी आंदोलनामुळे ‘बर्ड फ्लू’ पसरत आहेत’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

50 वर्षीय विधवेवर सामूहिक बलात्कार; नराधमांनी केलेला प्रकार ऐकून काळजाचा थरकाप उडेलृ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या