बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा, गाईचं कल्याण हेच देशाचं कल्याण’; उच्च न्यायालयाचं मत

लखनऊ | गायीला भारतीय संस्कृतीत पवित्र स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्यात यावं, असं मत अलाहबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. गोहत्येचा आरोपी जावेदची जामीन याचिका फेटाळताना न्यायमूर्ती शेखर यादव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

उत्तर प्रदेशातील जावेद नावाच्या व्यक्तीवर गोहत्येचा गुन्हा दाखल झाला असून तो सध्या अटकेत आहे. आरोपी जावेदची जामीन याचिका फेटाळण्यात आली. गोरक्षा आणि त्याला प्रोत्साहन देणं हे कुठल्याही धर्माशी जुळलेलं नाही. गाय ही भारताची संस्कृती आहे. संस्कृतीचं रक्षण करणं हे देशातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असो, असं न्यायमूर्ती शेखर यादव यांनी म्हटलं आहे.

गायीची हत्या करणं तर मोठा गुन्हा आहेच मात्र गायीला कुठल्याही प्रकारची इजा करण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तीलाही शिक्षा व्हायला हवी, असंही न्यायमूर्ती यादव यांनी म्हटलं. गाईचं कल्याण हेच देशाचं कल्याण आहे, त्यामुळे गाईचं संरक्षण करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे, असं मत देखील न्यायमूर्ती शेखर यादव यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, भारत हा एकमेव देश आहे जिथे सगळ्या जातीधर्माचे लोक एकोप्यानं राहतात. धर्म जरी वेगळा असला तरी देशाच्या संदर्भातील त्यांचा विचार मात्र समान आहे. कुठल्याही धर्माचा व्यक्ती असला तरी त्यानं गोरक्षा केली पाहिजे. त्यामुळे संसदेत विधेयक आणून केंद्र सरकारनं गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्यावा, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

भाजपला आंदोलन भोवलं! चंद्रकांत पाटलांसह महापौरांवर गुन्हा दाखल

“…नाहीतर सप्टेंबरमध्ये कोरोना नियम कडक करावे लागतील”

अनिल देशमुखांच्या जावयाची तब्बल 20 मिनिटं सीबीआय चौकशी

धक्कादायक! राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ पाहा आकडेवारी

अमेरिकेच्या पाठीचा कणा मोडला, आता भारतातील…; अल-कायदा संघटनेनं तालिबान्यांना चिथवल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More