महाराष्ट्र मुंबई

“कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या डॉक्टरांना कोरोना योद्धा जाहीर करा”

मुंबई | ज्या डॉक्टरांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. अशा डॉक्टरांना राज्य शासनाने कोरोना योद्धा जाहीर करून त्याचं कोरोना वीरचक्र देऊन गौरव केला पाहिजे, अशी मागणी इंडियन मेडिकल अससोसिएशनने केली आहे.

कोरोना योद्धा जाही करण्याच्या मागणीबरोबरच आयएमए आणखी काही मागण्या केल्या आहेत. त्यात, शासकीय आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर याना ज्या पद्धतीने 50 लाखाचे विमा कवच जाहीर केले आहे, त्याप्रमाणे ते खासगी व्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचारी आणि डॉक्टरांना जाहीर करावं, असं इंडियन मेडिकल अससोसिएशनने म्हटलंय.

गुणवत्तापूर्ण पीपीई किट रास्त भावात बाजारात उपलब्ध करून दयावे जेणे करून खासगी व्यवस्तीत डॉक्टर याचा वापर करू शकतात. त्याचप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांनी खासगी सेवेतील डॉक्टर आणि परिचारिकांना अपराधीपणाची वागणूक देऊ नये, अशी मागणी आयएमएने केलीये.

दरम्यान, मानसिक आणि शारीरिक दुःखातून बाहेर काढणाऱ्या या डॉक्टरांना यापूर्वीच पंतप्रधानांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची गणना ‘योद्धे’ म्हणून केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘डॉ. श्रीकांत जिचकर लिडर्स फेलोशीप’ कार्यक्रमाची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून घोषणा

पुण्यात आज 169 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…

महत्वाच्या बातम्या-

असाल तुम्ही सर्वेसर्वा पण…; राज्यपालांविरुद्ध मनसे नेत्या रूपाली पाटील आक्रमक

राज्यपालांनी सरकारचा ‘तो’ आदेश फिरवला, आता नवा वाद सुरु

राज्यात आज 2287 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; पाहा तुमच्या भागात किती?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या