बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा नाहीतर, 2 ऑक्टोबरला जलसमाधी घेणार”

मुंबई | गेल्या अनेक दशकापासून भाजपचं राजकारण हिंदूत्वाच्या मुद्द्यावर फिरत आहे. तर भाजपच्या समविचारी आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांसारख्या अनेक संघटना भारताला हिंदूराष्ट्र घोषित करण्याची मागणी वारंवार करताना दिसत आहेत. त्यातच आता अयोध्यातील संत परमहंस यांनी थेट मोदी सरकारला अल्टीमेटम दिला आहे.

अयोध्येच्या तपस्वी छावणीत आज सनातन धर्म संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी 1 ऑक्टोबरला पुन्हा सनातन धर्म संसदेचं आयोजन केल्याची घोषणा त्यांनी केली. या धर्म संसदेत भारताला हिंदूराष्ट्र बनवण्यावर चर्चा होईल. त्यावर केंद्र सरकारने काही निर्णय घेतला नाही तर 2 ऑक्टोबरला शरयू नदीत जलसमाधी घेण्यात येईल, असं संत परमहंस यांनी सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी संत परमहंस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी आत्मदहन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर संत परमहंस चितेवर बसले असताना पोलिसांनी रोकलं होतं. त्यानंतर आता त्यांनी जलसमाधी घेण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, मी समाधी घेतल्यानंतर कदाचित पंतप्रधान भारताला हिंदूराष्ट्र घोषित करतील. कारण जर हिंदू वाचला नाही तर काहीच वाचणार नाही, असंही संत परमहंस म्हणाले आहेत. त्यामुळे आता मोदी सरकारच्या चिंता देखील वाढल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

किंग कोहलीने रचला इतिहास; ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

उद्या आणि परवा राज्यात मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून खबरदारीचा इशारा

“मी जनरल डायरसारखा प्रचार करत पार्थ पवारला पराभूत केलं”

“शिवसेना रेसचा घोडा, घोडे लावण्यात आम्ही एक्स्पर्ट”

“आमचं ठरलंय! महाविकास आघाडी सरकारची रिक्षा पंक्चर करायची”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More