बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांचं नागरिकत्व काढून भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित करा”

नवी दिल्ली | भारताला 2 ऑक्टोबरपर्यंत ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित करा, अशी मागणी जगदगुरु परमहंस आचार्य महाराज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारकडे केली आहे. त्यांनी केलेल्या मागणीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. जर तसं न केल्यास आपण टोकाचं पाऊल उचलणार असल्याचं देखील परमहंस आचार्य महाराज यांनी सांगितलं आहे.

2 ऑक्टोबरपर्यंत सरकारने भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित करावं अन्यथा मी शरयू नदीमध्ये जलसमाधी घेईल, अशी घोषणा परमहंस आचार्य महाराजांनी केली आहे. अयोध्यामध्ये ते बोलत होते त्यावेळी परमहंस आचार्यांनी सरकारने मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांचं नागरिकत्व काढून घ्यावं, असं देखील म्हटलं आहे.

मंगळवारी सूरतमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदूत्वावर आपलं मत व्यक्त केलं. यावेळी बोलताना,  जगाला शक्तीचीच भाषा कळते. आपल्याला शक्तीशाली बनावं लागेल मात्र अशी शक्ती अत्याचारासाठी कधीच वापरली जाऊ नये, असं भागवत म्हणाले.

दरम्यान, हिंदूत्त्व एक वैचारीक व्यवस्था असून सर्वांना सोबत घेऊन चालणे आणि एकत्र आणण्याचा विचार या व्यवस्थेतून मांडला जात असल्याचं मोहन भागवत यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार”

पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांकडून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश!

IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी दोन सामने, बीसीसीआयचा मोठा निर्णय!

शिवभोजन थाळी आता मोफत नाही, 1 ऑक्टोबरपासून ‘इतक्या’ रुपयांना मिळणार थाळी!

पांड्या इज बॅक! सलग तीन पराभवानंतर मुंबईची गाडी विजयी पथावर, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More