Top News मनोरंजन

‘KGF Chapter 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनादिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा’, चाहत्याचं पतंप्रधानांना पत्र

मुंबई | दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा ‘KGF Chapter 2’ हा चित्रपट 16 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यापासून चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यशच्या चाहत्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ‘KGF Chapter 2’ च्या प्रदर्शना दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.

यशच्या एका चाहत्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीलं आहे. या पत्रात त्यानं लिहीलं आहे की ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनादिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा. कृपया आमच्या भावना समजुन घेण्याचा प्रयत्न करा. हा चित्रपट नाही तर आमची भावना आहे. धन्यवाद. रॅाकींग स्टार यश बॅासचा चाहता.

यशच्या चाहत्याने पंतप्रधानांना पाठवलेलं हे पत्र सोशल मीडियवर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, यशच्या इतर चाहत्यांनी सुद्धा आपल्या ट्विटर अकाउंटवर हे पत्र शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पत्राचा विचार करण्याची मागणी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“देशाच्या एकतेला प्राधान्य राहिल अशी सर्वांनी शपथ घ्यायला हवी”

शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंना दिलेल्या धमकीवर अजित पवार म्हणाले…

आदित्य ठाकरेंनी उडवली मनसेची खिल्ली, म्हणाले…

ठाकरे सरकारने पंकजा मुंडेंचं ‘ते’ धोरण ठेवलं कायम

“अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन झाली आहे”

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या