बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आकडेवारी

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे, म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे. काल यासंबंधीची नवी सुधारीत नियमावली सरकारतर्फे जारी करण्यात आली. काल दिवसभरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे, पण धोका अजूनही कायम आहे.

दिवसभरात राज्यात तब्बल 47 हजार 288 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून,  मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला  मिळालं, काल 155 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना काल त्यातुन थोडा दिलासा मिळाला आहे. राज्यात आतापर्यंत 56 हजार 033 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्याचबरोबर राज्यात सध्या एकूण 4 लाख 51 हजार 375 सक्रिय रूग्णसंख्या आहे.

महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात विकेंड लाॅकडाऊन घोषित केला, पण आतातरी लोक नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे. काल दिवसभरात पुण्यातुनही काही प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 4 हजार 077 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम हळु-हळु होत असल्याचं दिसुन येत आहे.

थोडक्यात बातम्या

अनिल देशमुख नवी दिल्लीत दाखल, ‘या’ बड्या लोकांना भेटल्याची माहिती

“साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करेल त्याचा पराभव निश्चित आहे”

सचिन वाझेच्या प्रकरणात नवीन ट्विस्ट; NIA च्या ताब्यात ‘ती’ स्पोर्टस बाईक

…तर सरकारमधील अर्धा डझन मंत्री घरी जातील; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

पुण्यातील लॉकडाऊनसंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More