बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास मेंदुवरही होऊ शकतो परिणाम!

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेसोबत लढा सुरु असून, संसर्गात वाढ झाल्यामुळे सक्रीय रुग्णवाढ आता चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे. याचा ताण सहाजिकच आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना आॅक्सिजन पातळीत घट होण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. अशातच श्वसन यंत्रणेवरच नाही तर मेंदूवरही परिणाम होत आहे.

कोरोनामुळे आॅक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांमध्ये ही बाब जास्त दिसून आली आहे. या रुग्णांमध्ये भ्रम निर्माण होणे, अचानक मानसिक स्थिती बदलणे अशा समस्या समोर येत आहेत. आॅक्सिजनच्या कमतरेतमुळे मेंदुतील ग्रे मॅटर कमी झाल्यानं असं होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मेंदूचं सीटी स्कॅन केल्यानंतर ग्रे मॅटरची मोजणी करण्यात आली, त्यात ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाचा श्वसनावरच नाही तर मेंदूवरही परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. जॉर्जियातील एका विद्यापीठानं केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे.

दरम्यान, ग्रे मॅटर आपल्या मेंदूतील नर्वस सिस्टमचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मसल्स कंट्रोल, स्पर्श जाणवणे, बघणे, ऐकणे, आठवण, आपल्या भावना, बोलणं, निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास या सारख्या गोष्टी अवलंबून असतात.

थोडक्यात बातम्या – 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून स्थानिक नागरिक आणि राज्य सरकारमध्ये खडाजंगी

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! एका झाडावर घेतलं 22 जातींच्या आंब्यांचं उत्पादन

सुशांतच्या वडिलांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली, बायोपिक प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनामुक्तीच्या दिशेने पुणेकरांचं पहिलं पाऊल, आजचीही आकडेवारी दिलासा देणारी

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते बुद्धदेव दासगुप्ता यांचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More