बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जनतेच्या सेवेत समर्पित, म्हणत राज्यमंत्री झाल्यावर भारती पवार संसदेत जाताना नतमस्तक

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार काही दिवसांपूर्वी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांची  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आहे. राज्यमंत्री झाल्यानंतर भारती पवार आज प्रथमच पावसाळी अधिवेशनासाठी संसदेत गेल्या. यावेळी संसदेत जाताना भारती पवार संसदेच्या पायऱ्यांपाशी नतमस्तक झाल्या.

संसदेच्या पायऱ्यांपाशी नतमस्तक होतानाचे फोटो ट्वीट करत भारती पवार म्हणाल्या की, भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुरू होत असलेल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नतमस्तक होत कायमस्वरुपी जनतेच्या सेवेत समर्पित.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात आपली वर्णी लागल्यानंतर भारती पवार यांनी जी जबाबदारी मिळाली आहे, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असं म्हटलं होतं. तसेच जनतेच्या आशीर्वादाने हे सरकार स्थापन झालं आणि या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. यासाठी मी जनतेचे आभार मानते, असं भारती पवार म्हणाल्या होत्या.

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे देखील आभार मानले होते. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात एकूण 43 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यामध्ये 11 महिलांचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या –

“CM फंडसाठी निधी द्या, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी गर्दी नको”

“ज्यांनी यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला, हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करताहेत”

एकनाथ खडसे यांना ईडीचा दणका; अटकेत असलेल्या जावयाबाबत ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

येत्या निवडणूकीमध्ये एखादा उमेदवार निवडून नाही आला तरी चालेल, पण…, – देवेंद्र फडणवीस

मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असु शकत नाही- अमोल मिटकरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More