बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भन्नाटच… मला मैदानात असे 11 जडेजा पाहिजेत”

मुंबई |  आयपीएलचा 8वा सामना चेन्नई सुपर किंग आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेेळला गेला. या सामन्यात चेन्नईचा प्रमुख गोलंदाज असलेल्या दीपक चाहरने धारदार गोलंदाजी करत पंजाबचे धुरंदर ढेर केले. या सामन्यात त्याने 4 फलंदाजांना बाद केलं होतं. युनिव्हर्सिल बॉस ख्रिस गेल याने मारलेल्या वेगवान फटक्यावर रविंद्र जडेजाने सुंदर झेल पकडला, त्याच्या या झेलवर दीपक चाहरने प्रतिक्रिया दिली आहे.

जेव्हा मी मयंक अग्रवालचा बळी घेतला तेव्हा मी सर्वाधिक आनंद लुटला असं मला वाटतं. पहिल्या षटकात ऋतुराज गायकवाडकडे गेलेला झेल हा खूप वेगवान होता आणि तो झेल फक्त जडेजासारखा क्षेत्ररक्षक पकडू शकतो. मी त्यावेळी विचार करत होतो की जडेजा तिथे असायला पाहिजे होता. तो जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असून त्याने माझ्या चेंडूवर बरेच झेल पकडले आहेत. त्यामुळे मला मैदानावरील सर्व अकराही खेळाडूंमध्ये जडेजाला पाहायचं आहे, असं दीपक चाहर म्हणाला.

पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात दीपक चाहरने आक्रमकपणे गोलंदाजी करत 4 षटकात केवळ 13 धावा देत 4 महत्वाचे फलंदाज बाद केले. त्याच्या या फलंदाजीमुळे पंजाबच्या पहिल्या 6 षटकात 26 धावा झाल्या होत्या तर तोपर्यंत अर्धा संघ डगआऊटमध्ये पोहचला होता. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.

दरम्यान, रविंद्र जडेजाचं क्षेत्ररक्षण या सामन्यात उल्लेखनीय राहिलं. त्याने सामन्यात 2 चांगले झेल घेतले. त्याच बरोबर पंजाबचा कर्णधार केएल राहुल याला धावबाद करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली होती.

थोडक्यात बातम्या-

मराठी चित्रपट चालत नाहीत याला मराठी प्रेक्षकच जबाबदार; प्रसाद ओक संतापला

कोरोना झाला, दिवसभर फिरुनही बेड मिळाला नाही; पुण्यातील महिलेची आत्महत्या

करण जोहरनं कार्तिक आर्यनला सिनेमातून काढलं, यापुढेही काम देणार नाही?

पत्नीचं दुसऱ्याशी अफेअर, पती ढसाढसा रडला अन् उचललं धक्कादायक पाऊल

कोरोना काळात ‘गरिबांचा मसीहा’ बनलेल्या सोनू सूदलाही कोरोनाची लागण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More