भर सामन्यात दीपकने फोडली लग्नाची सुपारी, प्रेयसीला केलं प्रपोझ, पाहा व्हिडीओ!

मुंबई | चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात पंजाबने विजय मिळवला. पंजाबचा कर्णधार के. एल. राहुलने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीवर पंजाबने चेन्नईचा सहज पराभव केला. मात्र चर्चा आहे ती चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाज दीपक चहरची, कारण किस्साही तसाच काहीसा घडला आहे.

सामना संपल्यानंतर दीपक चहरने आपल्या प्रेयसीला फिल्मी स्टाईलने लग्नाची मागणी घातली. राहुलच्या प्रेयसीने वेळ न घालवता लगेच होकार कळवला. त्यानंतर दीपकने तिच्या हातात अंगठी हातात घालत प्रेक्षकांच्या साथीने साखरपुडा उरकून घेतला. सोशल मीडियावर दीपकच्या प्रपोझलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या सामन्यामध्ये चेन्नई संघाने पंजाबसमोर 134 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, फाफ डुप्लेसिस वगळता चेन्नईच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंजाबने या लक्ष्याचा पाठलाग करताना राहुलने केलेल्या धमाकेदार खेळीमुळे पंजाबने 13 षटकातच विजय साकार केला.

दरम्यान, आयपीएलच्या या हंगामातील सर्वात जास्त षटकार राहुलच्या नावावर आहेत. तर 626 धावा करत ऑरेंज कॅप सध्या राहूलच्याच नावावर आहे. आतापर्यंत आयपीएलच्या 14 व्या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनी प्रवेश केला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

क्लासी राहुलच्या वादळी खेळीने पंजाबच्या आशा पुन्हा जिंवत; तब्बल ‘इतक्या’ षटकारांची केली आतषबाजी!

वरूण गांधींना मोठा धक्का! शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं कार्यकारिणीतून डच्चू

‘अजित पवारांच्या कंपन्यांवर टाकलेल्या धाडीवरून स्पष्ट होतं की…’; मलिकांचा गंभीर आरोप

“उद्धवजींची बोली अन् बंदुकीची गोळी एकसारखीच, त्यांचा आदेश आला की…”

“पवार घराण्याला महाराष्ट्र लुटायचा काय ठेका दिलाय का?”

Chennai super kingsdeepak chaharDeepak Chahar ProposaliplMarathi NewsPunjab Kingsआयपीएलचेन्नई सुपर किंग्जदीपक चहरदीपक चहर प्रपोझपंजाब किंग्जमराठी बातम्या