MS Dhoni | धोनी CSK साठी IPL किती वर्ष खेळणार?; ‘या’ खेळाडूनं सांगितलं

MS Dhoni | यंदाच्या आयपीएलमध्ये सामने सुरू होण्यापुर्वीच काही विक्रम झाले आहेत. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच एका विदेशी खेळाडूवर सर्वाधिक बोली लागली आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिंसवर सर्वाधिक म्हणजे जवळपास 25 कोटींची बोली लागली. त्यामुळे यंदाचा आयपीएल खास असणार आहे. त्यात csk चा कर्णधार महेंद्रसिंह धोनीदेखील (MS Dhoni) हा आयपीएल खेळणार असल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेना झालाय.

धोनी मागील वर्षी म्हणजेच 2023 मध्येच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करणार होता. मात्र त्याने मला माझ्या चाहत्यांना रिटर्नमध्ये काहीतरी द्यायचं म्हणत त्याने अजून एक वर्ष खेळणार असं म्हटलं होतं. तसे तर त्याने अजून दोन-तीन वर्ष खेळावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. आता यावरच csk मधीलच एका खेळाडूने मोठं विधान केलं आहे. csk चा खेळाडू दीपक चहरने धोनीबद्दल मोठे विधान केलं आहे. ते आता चर्चेत आलं आहे.

“धोनी दुखापतीतून बऱ्यापैकी रिकव्हर झाला”

“माही भाई (MS Dhoni) बऱ्यापैकी रिकव्हर झाले आहेत. त्यांनी चेन्नई सुपरकिंग्ससाठी कमीत-कमी दोन ते तीन वर्ष खेळलं पाहिजे. मी माही भाईला एका मोठ्या भावासारखे बघतो. मला त्यांच्याकडून अजून खूप काही शिकायचे आहे.”, असं दीपक चहर म्हणाला आहे.

धोनीला IPL 2023 दरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. धोनी स्पर्धेतील अनेक सामन्यांमध्ये चालतानाही दिसला होता. या स्पर्धेनंतर माहीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यातून तो आता जवळपास बरा झाला आहे. त्यामुळे लवकरच धोनीने अजून काही वर्ष खेळायला हवं, अशी अपेक्षा दीपक चहर सोबतच सर्व चाहतेही व्यक्त करत आहेत.

धोनीचे आतापर्यंतचे क्रिकेट करीअर

धोनीने (MS Dhoni) IPL चा पहिल्या सत्रापासून म्हणजे 2008 पासूनचा भाग आहे. त्याने आतापर्यंत 250 IPL सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये 218 डावात फलंदाजी करताना त्याने 38.79 च्या सरासरीने आणि 135.92 च्या स्ट्राइक रेटने 5082 धावा केल्या आहेत. त्याने 24 अर्धशतकं झळकवली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 84 धावा आहे.

तसेच त्याने भारताला 3 ICC ट्रॉफी (2007 T20 विश्वचषक, 2011 विश्वचषक, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकून दिल्या आहेत. त्याने आयपीएलमध्येही 5 ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत. 2023 मध्ये झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात धोनीने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. देत आपण अजून एक वर्ष आयपीएल खेळणार असल्याचं त्याने म्हटलं होतं. त्यामुळे यंदाचा आयपीएल हंगाम धोनीच्या चाहत्यांसाठी खास असणार आहे.

News Title-  Deepak Chahar reaction to MS Dhoni

 महत्त्वाच्या बातम्या –

Ncp | राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट समोर!

Bigg Boss 17 | ..अन् अंकितासाठी पती विकी जैन ढसाढसा रडला; सलमान खानही झाला चकित

Animal Movie च्या टीकाकारांना रणबीर कपूरचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाला…

Team India | गिलला बाकावर बसवण्याची वेळ आलेय का? दुसऱ्या सामन्यासाठी भारताची अशी असेल तयारी

Bihar Politics | “मला विश्वास आहे की…”, Nitish Kumar यांना PM मोदींच्या शुभेच्छा