बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Ind Vs Sri: चहरनं केला कहर, भारत हारता हारता वाचला!

मुंबई | श्रीलंकेच्या आर. प्रेमदासा स्टेडिअममध्ये भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातला दुसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत अखेर विजय खेचून आणला. 6 गडी बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या दीपक चाहरने अर्धशतकीय खेळी केली. तर भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहरने शेवटपर्यंत चिवट झुंज दिली आणि अखेर भारताने हा सामना 3 गडी राखून खिशात घातला.

नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला. श्रीलंकेच्या सलामवीरांनी चांगली सुरूवात करून दिली. पहिल्या 10 षटकातच श्रीलंकेच्या एकही गडी न गमावता 71 धावा झाल्या होत्या. त्यानंतर फिरकीपटू यजुवेंद्र चहल फिरकीची जादू दाखवत दोन गडी बाद केले. त्यानंतर श्रीलंकेची धावसंख्या हळूहळू वाढू लागली. श्रीलंकेकडून करूनारत्ने, आसलंका, आविश्का फर्नांन्डोने चांगली फलंदाजी करत श्रीलंकेला 275 धावांवर पोहचवलं. तर भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी 3 गडी बाद केले.

276 धावांचा पाठलाग करताना भारताची खराब सुरवात झाली. मागील सामन्यात चमकणारा पृथ्वी शाॅ या सामन्यात काही खास खेळी करू शकला नाही. पृथ्वी शाॅ आणि ईशान किशन लवकर तंबूत परतले. तर दुसरीकडे कर्णधार शिखर धवनने संयमी खेळी केली. मनिष पांडे आणि सुर्यकुमार यादवने मि़डल ऑर्डर सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देखील 116 धावांवर 5 गडी बाद अशी भारताची परिस्थिती होती. भारताचा पराभव निश्चित असल्याचं दिसत असतानाच दीपक चाहरने मैदानात येत सुरवातीला संयमी आणि नंतर आक्रमक फलंदाजी केली. त्याने 8 व्या क्रमांकावर खेळायला येऊन 69 धावा केल्या आणि जबरदस्त चौकार मारत अखेर सामना जिंकवला.

दरम्यान, सामना जिंकत भारताने मालिका देखील खिश्यात घातली आहे. भारत सध्या 2-0 ने आघाडीवर आहे. ही सिरीज जिंकताच श्रीलंकेविरूद्ध सलग तीन सिरीज जिंकण्याचा कारनामा देखील भारताने केला आहे. या सामन्यात संघातील अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांची कामगिरी निराशाजनक राहिली पण दीपक चाहरच्या रूपात भारताला नवा अष्टपैलु खेळाडू मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोना को मत डरो ना…’; रामदास आठवलेंच्या कवितेनं राज्यसभेत एकच हशा

मास्क घालणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी पुण्यात मास्क लावलाच!

“पतीच्या अटकेनंतर शिल्पा कोणत्या परिस्थितीतून जात असेल, याची कल्पनाही करु शकत नाही”

लाईव्ह मॅचदरम्यान या व्यक्तीने महिलेसोबत केलं वाईट कृत्य; व्हिडीओ व्हायरल

5 वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More