“होय… मणिशंकर अय्यर यांच्या घरी ती बैठक झाली होती”

MANI SHANKAR AIYAR

नवी दिल्ली | काँग्रेसमधून बडतर्फ केलेले नेते मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली होती, असा दावा माजी लष्करप्रमुक दीपक कपूर यांनी केलाय. कपूर यांच्या या दाव्यामुळे काँग्रेस अडचणीत सापडली आहे. 

मोदींनी अशी बैठक झाल्याचा दावा केला होता. तसेच या बैठकीनंतर पाकिस्तानचे अधिकारी अहमद पटेलांना गुजरातचे मुख्यमंत्री करण्याची विनंती करत होते, असंही मोदींनी म्हटलं होतं.

दरम्यान, काँग्रेसने हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं होतं. दीपक कपूर यांनी आपण स्वतः या बैठकीला उपस्थित असल्याचं सांगितलं. मात्र या बैठकीत फक्त परराष्ट्र विषयावरच चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलंय.