‘अनिल परबांचा फोन तपासा…’; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई | शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आणि पक्ष डबघाईला आल्यानंतर शिवसेना नेते आता पक्ष सावरण्यासाठी कामाला लागले आहेत. शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री आणि नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार आणि त्यांच्या नेत्यांवर अनेक आरोप आणि आगपाखड केली. त्याला आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
त्यांनी आदित्य ठाकरे यांना वडिलकीचा सल्ला दिला आहे. केसरकर म्हणाले, अजून तुम्ही लहान आहात, आणि प्रादेशिक अस्मिता काय असते, हे तुम्हाला अजून ठाऊक नाही. त्यामुळे आम्ही हाडाचे शिवसैनिक असून टीका करताना जरा मर्यादा ठेऊन आणि विचार करून बोला. दीपक केसरकर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत संदीपान भुमरे, संजय राठोड आणि दादा भुसे उपस्थित होते.
आदित्य ठाकरेंच्या टीकांना उत्तरे देण्यासाठी केसरकरांनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) केलेल्या फोनचा दाखला देत गौप्यस्फोट केला. तुम्ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना बाजूला ठेवा आम्ही भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी तयार आहोत, असं ठाकरे बोलल्याचा गौप्यस्फोट केसरकरांनी केला.
शिवसेनेने या फोनला नकार दिला. त्यांनी तसा कोणताही फोन केला नसल्याचं म्हटलंय. त्यावर पुष्टी करताना केसरकर म्हणाले, तुम्ही पक्षाच्या क्रमांक दोनच्या असलेल्या नेत्याविरोधात असले कट रचत आहात, तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचं काय? तसेच तुम्हाला पुरावे हवे असतील तर अनिल परबांचा (Anil Parab) फोन तपासा, असं यावेळी दीपक केसरकर म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
‘या’ लोकांना दारूपासून जास्त धोका; अभ्यासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर
“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये”
“डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?”
नीरव मोदीला ईडीचा जोर का झटका; केली ‘ही’ मोठी कारवाई
शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…
Comments are closed.