धनुष्यबाण चिन्हाबाबत दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…
मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करुन शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदार, अनेक जिल्हाप्रमुख आणि नगरसेवक पदाधिकारी पळवले. त्यानंतर त्यांनी आपलाच गट म्हणजे खरी शिवसेना (Shivsena) असा देखील दावा केला. त्यानंतर शिवसेनेची आणि शिंदे गटाची न्यायालयीन लढाई सुरु झाली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आपल्या गटाला मिळावं याकरता निवडणूक आयोगाकडे मागणी केली.
त्यामुळे आता शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचं? असा संभ्रम राज्यात निर्माण झाला आहे. याच परिस्थितीवर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. निवडणूक आयोग (Election Commission) जे चिन्ह आम्हाला देईल, ते स्वीकारुन आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ, असं केसरकर म्हणालेत. त्यामुळे आता राजकारणात खळबळ ऊडाली आहे.
मुंबईत प्रसार माध्यामांशी ते संवाद साधत होते. पुढे ते म्हणाले, आम्ही आगामी काळात युती म्हणूनच निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. आता मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना लोक आमच्या युतीला पसंती देतील की, तुमच्या आघाडीला? हे आगामी काळ ठरवेल.
आम्ही शिवसेना सोडली नाही, आम्ही पक्षात राहुनच उठाव केला आहे, असं देखील ते म्हणालेत. आम्ही शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारमधुन बाहेर पडावं, अशी मागणी केली होती. पण पक्षप्रमुखांनी आमचं ऐकलं नाही. त्यामुळे आम्ही उठाव केला. आम्ही अद्याप कोणत्याही पक्षात गेलो नाही किंवा शिवसेना सोडली नाही, त्यामुळे आमच्या गटाचं निवडणूक चिन्ह हे धनुष्यबाण राहील, असं दीपक केसरकर म्हणालेत.
थोडक्यात बातम्या –
संसदेबाहेरील काँग्रेसच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची टीका, म्हणाले…
नक्की कुठे चुकलं?, उद्धव ठाकरे म्हणाले ‘गुन्हा माझाय, चूक माझी आहे’
“मी बरा होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले, तेच पक्ष बुडवायला निघालेत”
काळजी घ्या! ‘या’ लोकांना मंकीपॉक्सचा सर्वात जास्त धोका, महत्त्वाची माहिती समोर
‘एकनाथ शिंदेंची भूक अजून भागली नाही का?’; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
Comments are closed.