महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

“नारायण राणे ज्या ज्या ठिकाणी जातात तिकडची सत्ता जातेच”

मुंबई | नारायण राणे ज्या-ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणची सत्ता जातेच, अशा शब्दात शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी भाजप नेते नारायण राणेंवर टीका केली आहे. दीपक केसरकर यांनी नेवाळी आणि 14 गाव परिसरात जाऊन केली शेतीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करून शिवसेनेला संपवण्याची खेळी होती. मात्र ती यशस्वी होऊ शकली नाही, असा टोलाही यावेळी केसरकरांनी राणेंना लगावला.

कोकणात राणे विरूद्ध शिवसेना हा वाद जुना आहे. कोणत्याही राजकीय भूमिकेचे वावादाचे पडसाद कोकणात उमटत असतात. शिवसेना वा नारायण राणे एकमेकांना डिवचत असतात. निकाल लागल्यावर 15 दिवसांनी राणेंनी भाजप सत्तास्थापनेच्या विचारत आहेत, असं म्हणत सेनेला डिवचलं होतं. आता सेनेने राणेंना डिवचलं आहे.

भाजपच्या सत्तास्थापनेसाठी नारायण राणे नेमक्या कोणत्या पक्षाचे आमदार भाजपकडे खेचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा करत आहेत, याबाबत स्पष्टता नाही, असं शिवसेना नेते संजय राऊ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केसकरांच्या या टीकेला राऊत काय उत्तर देणार हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या