बालभारती पुस्तकातील ‘वन्समोअर’ शब्दावरून वाद; शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिलं स्पष्टीकरण

Deepak Kesarkar | बालभारतीच्या मराठी पुस्तकात गेल्या काही दिवसांपासून एक कवितेचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.  सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या बालभारती पुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ या कवितेत एका इंग्रजी शब्दावरून वादंग निर्माण झाला आहे. वन्समोअर या इंग्रजी शब्दावरून कवितेवर आणि शिक्षण मंडळावर टीका झाली. अशातच आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. त्याची जोरदार चर्चा होतेय.  यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी भाष्य केलं आहे.

‘वन्समोअर’ शब्दावर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण

कवितेच्या एकूण दर्जावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळं राज्यातील शिक्षण विभाग टार्गेटवर आहे. यावर आता दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं. सोशल मीडियावर होत असलेल्या वादावर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले की, वन्समोअरला पर्यायी शब्द आहे का? असा सवाल त्यांनी केला. शेवटी यमक जुळवण्यासाठी बाऊ झाला नाही असं बिल्कुल नाही. आपण मराठीमध्ये टेबल हा शब्द वापरतो. तो मराठी शब्द आहे का? असा पुन्हा एकदा त्यांनी सवाल केला.

मराठी भाषेत अनेक इंग्रजी शब्द रूळल्याचं दिसून येत आहे. त्याला आता पर्यायी शब्द आहे का? असा सवाल उपस्थित केला. काही मराठी शब्दांना पर्यायी शब्द नाहीत. त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण थोडसं प्रॅक्टिकल राहिलं  पाहिजे.

मी मराठी भाषेचा मंत्री आहे. मराठी भाषेचं धोरण मी आणलं होतं. त्यामुळे मराठी भाषेचा सर्वात जास्त अनुभव मलाच आहे. अठरा अठरा वर्षे मराठी भाषेचं धोरण आलं नव्हतं. त्यावेळी कोणालाही मराठी भाषेचा कळवळा आला नाही. शासकीय कार्यलयात मराठी भाषेत बोलणं आम्ही बंधनकारक केलं असल्याचं वक्तव्य दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलं आहे.

मराठीतला एखादा शास्त्रीय गायक गात असेल तेव्हा एखाद्याचं गाणं आवडल्यानंतर आपण वन्समोअर वन्समोअर असं म्हणतो. की पुन्हा एकदा, पुन्हा एकदा टाळ्या वाजवत म्हणत नाही. त्यामुळे त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. पुस्तक तज्ज्ञ काम करत असताना त्यांच्या कामात त्यांचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचं बोललं गेलं आहे. पुस्तकातील कविता निवडणारे देखील एखादे साहित्यिक असतात. प्रत्येक लहानसहान गोष्टींचा किती इश्यू करायचा असं दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले आहेत.

नेमका काय वाद झाला?

‘जंगलात ठरली मैफल’ असं या कवितेचं शिर्षक आहे. या कवितेची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. इयत्ता पहिलीचं इंग्रजी माध्यमाचं हे पुस्तक आहे. या कवितेच्या शेवटच्या कडव्यात ठुमकत नाचत आला मोर, वन्स मोअर, वन्स मोअर, असं शेवटचं कडवं लिहिण्यात आलं. त्यामध्ये शेवटच्या कडव्यात वन्स मोअर, वन्स मोअर या शब्दामुळे वादाला तोंड फुटलं आहे.

News Title – Deepak Kesarkar Explaination about Marathi Poem

महत्त्वाच्या बातम्या

“सत्ता आणायला छत्रपती लागतात, पण..”; जरांगे पाटलांचा आता थेट PM मोदींवरच हल्लाबोल

“मला जेलमध्ये टाकून जीवे मारले जाऊ शकते”; फडणवीसांचं नाव घेत जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप

मनोज जरांगेंच्या आरक्षणाला स्थगिती, सरकारला ‘या’ तारखेपर्यंत दिला वेळ

अजित पवार रात्री एक वाजता अमित शाहांच्या भेटीला; दिल्लीत मध्यरात्री मोठी खलबतं

“माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील”, अजितदादा गटातील आमदाराच्या मुलाचं मोठं वक्तव्य