बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर मी शरद पवारांच्या घरी जाऊन माफी मागून दिलगीरी व्यक्त करेन, ते माझ्या गुरुसमान”

मुंबई | शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेना फोडली असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना केसरकरांना सल्ला दिला. केसरकर जेव्हा बोलतील तेव्हा त्यांनी अभ्यास करुन संशोधनात्मक मतं मांडावीत. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करु नये, अशा शब्दांत अजित पवारांनी केसरकरांना सुनावलं आहे.

यावर आता दीपक केसरकरांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्याबाबत माझ्या तोंडून कधीही एकही अपशब्द गेला नाही, जाणार नाही. शिवसेनेत जी फुट पडली होती त्याबद्दल मी काही वक्तव्य केली होती. ही घडलेली वस्तू स्थिती होती. माझ्या जीवनाच्या जडणघडणीत ज्या मोठ्या लोकांचा वाटा आहे, शरद पवार त्यापैकी एक आहेत, असं केसरकर म्हणालेत.

मी शरद पवारांच्या घरी जाऊन माफी मागून दिलगीरी व्यक्त करेन. शरद पवार माझ्या गुरुसमान आहेत. त्यांच्या विरोधात मी बोलू शकत नाही. गैरसमज झाला असेल तर जाहीर दिलगीरी व्यक्त करेन, असं यावेळी दीपक केसरकर म्हणाले.

शरद पवार यांच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड (JItendra Awhad) मला भेटायला आले होते. पण ते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुलाचा प्रचार करा असं सांगायला आले होते. ते पवार साहेबांचा निरोप घेऊन माझ्याकडे आले नव्हते. पवार ज्या दिवशी सावंतवाडीला आले त्यावेळी मी माझ्या मतदारसंघात होतो. त्यावेळी मी माझा राजीनामा पवारसाहेब यांच्याकडे दिला. मी तुमच्यामुळे आमदार आहे पण मी राणेंच्या मुलाचा प्रचार करु शकत नाही असं मी त्यावेळी नम्रपणे स्पष्ट केल्याचं केसरकरांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांची मला फार काळजी वाटते, त्यांच्या मागे खूप मोठं षडयंत्र”

“मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री राज्याचा भार वाहत असताना राज्यपाल समुद्राच्या लाटा मोजतायत का?”

ललित मोदींच्या प्रेमात पडण्यापूर्वी सुष्मिताच्या ‘या’ 10 अफेअर्सचीही रंगली होती खूप चर्चा

मातोश्रीचे पूर्वीचे दिवस गेले म्हणत मनसेची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

‘सुरूवातीलाच अशी ओढाओढ चिठ्ठ्या देणं सुरू झालं, पुढे पुढे तर…’; अजित पवारांची बोचरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More