बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उद्धवजी अजूनही वेळ गेलेली नाही’, शिंदे गटाची उद्धव ठाकरेंना साद

मुंबई | शिवसेनेत बंड करुन एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं आणि आता त्यांनी आपणच खरी शिवसेना असा दावा देखील केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर देखील दावा केला आहे. त्यासाठी त्यांची न्यायालयात लढाई सुरु आहे. शिवसेनेच्या हातून धनुष्यबाण जाणार याची पूर्ण कल्पना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना आहे. त्यांनी त्याबाबत कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला आहे.

या पार्श्वभुमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, आमची उद्धव ठाकरेंना विनंती आहे की त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन सुवर्णमध्य काढावा, असं केसरकर म्हणाले. वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंबाबत मी काही बोलणार नाही. वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला तर मार्ग निघू शकतो. शेवटी वरिष्ठांच्या पातळीवर हे सर्व चालते. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चांगले संबंध आहेत. त्यांनी मार्ग काढावा, असंही केसरकर म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. त्यामुळे हा शिवसेनेच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. न्यायालयात 11 जुलै रोजी 16 अपात्र आमदारांवरच्या कारवाईचा निकाल आहे. त्यानंतर लगेच शिवसेनेचे धनुष्यबाण हातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता पक्ष बळकट करण्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत.

उद्धव ठाकरे धनुष्यबाण चिन्ह गेले तर नवीन चिन्ह थोड्याच अवधीतच घराघरात पोहोचवण्याची तयारी ठेवा आणि त्या अनुषंगाने कामाला लागा असा आदेश सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘…तर नव्या चिन्हाचीही तयारी ठेवा’, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती आणखी खालावली, महत्त्वाची माहिती समोर

मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार

राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट, शिंदे गटाच्या आमदारांना राग अनावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More