बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दीपक केसरकर यांचा मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | राज्यात सत्तासंघर्ष झाल्यापासून अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. मध्यंतरी राहुल शेवाळे यांनी शिवसेना आणि भाजप यांची युती होणार होती मात्र ती युती संजय राऊत यांच्यामुळे थांबली, असा गौप्यस्फोट केला होता. यातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनीही एक नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

आसामला गेल्यानंतर आम्ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भाजपसोबत एकत्र येण्याची विनंती केली. एकनाथ शिंदेंना सोडा आपण एकत्र येऊ, असं उद्धव ठाकरे भाजपला म्हणाले होते, असा गौप्यस्फोट शिंदे गटातील नेते केसरकर यांनी केला आहे. यापुढे या सगळ्या गोष्टी त्यांनी तपशीलवार सांगितल्या आहेत.

मध्यंतरी सुशात सिंह प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर असे आरोप केले होते. यासंबधी मी माझे स्वत:चे असे पर्सनल काॅन्टॅक्ट वापरुन पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांच्याशी बोलणी केली होती. यावेळी त्यांनी चांगली प्रतिक्रिया दिली होती, असं केसरकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

यानंतर भाजपने (BJP) राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला, त्यामुळे ठाकरे आणि मोदी यांचे फिस्कटले होते असंही पुढे ते म्हणाले. अशा गोष्टी होत राहतात. आमची बोलणी परत चालू होतील, असं ठाकरे मला म्हणाले होते. ही गोष्ट मी शिंदे याच्या कानावर घातली होती. या बोलणी वेळी रश्मी ठाकरेही तेथे उपस्थित होत्या, असा खुलासा त्यांनी केला.

थोडक्यात बातम्या

ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला!

मोठी बातमी! राहुल गांधी यांच्या दाव्याने खळबळ

आरबीआयचा मोठा निर्णय; कर्जदारांना धक्का

उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी गुड न्यूज; शिवसेनेचा भाजपला जोर का झटका

‘त्या’ डायरीने राऊतांची झोप उडवली; पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More