दीपक मानकरांच्या अडचणीत वाढ; आणखी एका गुन्ह्याची नोंद

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर जमीन बळकवल्याचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आदिती दीक्षित या महिलेची जमीन बनावट विकसन करारनामा आणि बनावट कुलमुख्त्यारपत्र तयार करून जमीन लाटल्याचा आरोप केला आहे. यात दीपक मानकरांसह आणखी दोन जणांवर देखील आरोप आहेत. 

दीक्षित यांची लोहगाव, विमाननगर आणि पुणे शहरात येथे वडिलोपार्जित जमीन आहे. मात्र त्या त्यांच्या कामानिमित्त परदेशात असतात. त्याचा दीपक मानकरांनी फायदा घेतला आहे, असं दिक्षीत यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, समाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी मानकर सध्या तुरुंगात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-…नाहीतर राज्यात दंगली उसळतील; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

-अयोध्येत श्रीरामाचा 100 मीटर उंचीचा पुतळा उभारणार; योगी आदित्यनाथांची योजना

2 महिन्यांचा पाठलाग; टी 1 वाघिण अखेर ठार

रामदास आठवलेंकडून शरद पवारांना उपपंतप्रधान पदाची आॅफर!

-एेश्वर्या रायला लालूच्या पोरानं पाठवली घटस्फोटाची नोटीस!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या