…म्हणून कॅटरिनाची गाडी पाहून दीपिकाने पळ काढला!

मुंबई | अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफमध्ये 36 आकडा असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. यावेळी कॅटरिनाची गाडी पाहून दीपिकाने पळ काढल्याचं समोर आलंय.

सलग दोन सिनेमे केल्यामुळे दीपिका पदुकोनला पाठदुखीचा त्रास जाणतोय, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती जिममध्ये जातेय. दरम्यान, याच जिमपुढे कॅटची गाडी पाहून दीपिकाने पळ काढल्याचं कळतंय.

अभिनेत्री दीपिका पदुकोन रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड आहे तर कॅटरिना आणि रणबीर सध्या रिलेशनमध्ये असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे दोघींमध्ये कडवटपणा आहे.