बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय कुस्तीपटूंचा निर्णायक डाव; दीपक पुनिया आणि रवी दहिया सेमीफायनलमध्ये दाखल

टोकियो | टोकियोमध्ये सध्या चालू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडू जीवाचं रान करून खेळत आहेत. परंतु भारताच्या पदरी निराशाच पडलेली दिसून येतीये. भारताच्या खात्यात आतापर्यंत केवळ दोनच पदकं पडली आहे. त्यातच आता ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तींच्या सामन्यास सुरूवात झाली आहे. आजचा दिवस भारतासाठी चांगला राहिला. दीपक पुनिया आणि रवी दहिया यांनी कुस्ती स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.

कुस्तीमध्ये पुरूषांच्या 57 किलो वजनीगटात रवी कुमार दहियाने दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. बल्गेरियाच्या कुस्तीपटूविरूद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात रवी दहियाने आक्रमक खेळी करत सुरूवातीपासून सामन्यावर वर्चस्व प्रस्तापित केलं. अखेरच्या लढाईत त्याने 14-4 अशी आघाडी घेतली आणि टेक्निकल सुपियाॅरिटी जोरावर त्याने विजय मिळवला.

तर दुसरीकडे 86 किलो वजनीगटात दीपक पुनियाने अखेरच्या काही सेकंदात निर्णायक डाव टाकत दमदार विजय मिळवला. चीनचा कुस्तीपटू शेन यांच्याशी झालेल्या सामन्यात दोघांनी आक्रमक खेळी केली. अखेरपर्यंत दोघांचे 3-3 अंक होते. अखेरचे काही सेकंद बाकी असताना दीपकने शेनला आपल्या डावात अडकवत 2 अंक मिळवले आणि सामना आपल्या नावावर केला. त्याचबरोबर त्याने सेमीफायनलमध्ये मजल मारली आहे.

दरम्यान, आज ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरूवात चांगली झाली. भालाफेक स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने धडाकेबाज कामगिरी केली. क्वालिफाइंग राऊंडमधून फायनल गाठण्यासाठी नीरजला 83.5 मीटरचं टार्गेट देण्यात आलं होतं. पण त्याने 86.65 मीटरवर भाला फेकून दाखवला आणि फायनलमध्ये

थोडक्यात बातम्या-

“अमित शहा संसदेत आले, तर मी टक्कल करेन आणि तुमच्या कार्यक्रमात येईल”

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाचा राज्यांना सतर्कतेचा इशारा, म्हणाले…

यो यो हनी सिंगच्या अडचणीत वाढ; पत्नीनं दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार

नीरज चोप्राची धडाकेबाज कामगिरी; भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये एन्ट्री

कोरोनानंतर आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ; लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संक्रमण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More