Top News

‘गर्व असणारच, मुलगा आहे माझा’; केरळ अपघातात मरण पावलेले पायलट दीपक साठे यांच्या आईची प्रतिक्रिया

केरळ | केरळमधील कोझीकोड येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात महाराष्ट्राचे सुपूत्र असलेले कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला. आपलेला असलेला प्रदीर्घ अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर कॅप्टन दीपक साठे यांनी अपघात टाळण्यासाठी सर्व प्रयत्न केले होते पण शेवटी अपघात झाला.

वैमानिक दीपक साठे हे मुंबईत आपल्या परिवारासोबत राहत होते. तर त्यांचे आई-वडील हे नागपूर येथे राहतात. दीपक साठे यांच्या निधनानंतर त्यांच्या आईने आपला मुलगा देशासाठी शहीद झाल्याचं म्हटलं आहे. त्या ‘बीबीसी मराठी’शी बोलत होत्या.

आमचा मुलगा देशासाठी शहीद झाला. आमचा मोठा मुलगाही सैन्यात होता आणि तोही शहीद झाला. दीपक याला स्वॉर्ड ऑफ ऑनरने गौरवण्यात आले होते. एअरफोर्सचे आठही पुरस्कार त्याला मिळाले होते. रायडिंग, स्विमिंग सर्व गोष्टींमध्ये टॉपवर होता. त्याला अनेक पुरस्कार मिळाले होते. लहानपणापासून अव्वल होता. एनडीएमध्ये मेडल मिलवलं. पहिला मराठी मुलगा ज्याला एअरफोर्सची सर्व पुरस्कार मिळवली. त्याने दाखवलेल्या समसूचकतेमुळे विमानातील इतरांचे प्राण वाचले, असं दीपक साठे यांच्या आईने म्हटलंय.

एअर इंडियासाठी कार्यरत असलेले वैमानिक दीपक साठे हे एकेकाळी एअरफोर्समधील एक कुशल वैमानिक म्हणून ते ओळखले जात होते. दीपक साठे यांना आपल्या कर्तृत्वाच्या बळावर वायुसेना अकादमीकडून स्वॉर्ड ऑफ ऑनर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

सॅल्यूट…दुर्घटना होऊ नये म्हणून भर पावसात मॅनहोलजवळ तब्बल 5 तास उभी राहिली महिला, पाहा व्हिडीओ

अभिषेकची कोरोना चाचणी निगेटीव्ह, अमिताभ बच्चन यांनी मानले देवाचे आभार

इंदुरीकर प्रकरणात न्यायालयाने निभावली महत्त्वाची भूमिका…

कहाँ गये वो 20 लाख करोड?, पाच दिवसीय आंदोलनातून युवक काँग्रेस मागणार हिशोब

जुन्रर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांचं कोरोनाने निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या