बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दीपक चहरच्या गोलंदाजीपुढे पंजाबचे खेळाडू ढेर; चेन्नई सुपर किंग्सचा पंजाबवर 6 विकेट्सने सहज विजय

मुंबई | आयपीएलचा 8वा सामना चेन्नई सुपर किंग आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या स्ट्राईक गोलंदाजाने अशी काही धारधार गोलंदाजी केली की पंजाब किंग्जचा संघ पत्यासारखा कोसळला. हा सामना चेन्नईच्या संघानं 26 चेंडू राखून जिंकला.

सर्वप्रथम नाणेफेक जिंकून चेन्नईने पंजाबला फलंदाजी करण्यास आमंत्रित केलं. पंजाबची सुरवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल चौथ्याच चेंडूवर बोल्ड झाला. त्यानंतर कर्णधार केएल राहुल धाव घेण्याच्या गडबडीत धावबाद झाला. युनिव्हर्सिल बॉस ख्रिस गेलं देखील काही चांगली कामगिरी करू शकला नाही. 10 धावा करत तो देखील लवकर बाद झाला. नेहमीप्रमाणे निकोलस पुरण काही खास कामगिरी करू शकला नाही. चेन्नईकडून दीपक चहरने धारधार गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकात केवळ 13 धावा देत 4 महत्वाचे फलंदाज बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे पंजाबला पहिल्या 6 षटकात केवळ 26 धावा करता आल्या आणि तोपर्यंत अर्धा संघ परतला होता. नुकताच पंजाबच्या संघात सामील झालेल्या शाहरूख खानने एकाकी झुंज दिली. त्याच्या या खेळीमुळे पंजाबला 106 धावा धावफलकवर लावता आल्या.

पंजाबने दिलेल्या 107 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात समाधानकारक झाली. ऋतुराज गायकवाडवर पुन्हा विश्वास ठेवून धोनीने त्याला पुन्हा संघात जागा दिली. पण त्याला केवळ 5 धावा करत्या आल्या. डुप्लेसिस दुसरी बाजू संभाळून ठेवली. मोईल अलीने सर्वाधिक 31 चेंडूत 46 धावा केल्या. अखेर 15.4 षटकातच चेन्नईने पंजाबनी दिलेलं टार्गेट पूर्ण केलं. चेन्नई ने हा सामना 6 गडी राखून जिंकला. त्याचबरोबर चेन्नईने या आयपीएल हंगामातील पहिला विजय नोंदवला आहे.

दरम्यान, दीपक चाहरची गोलंदाजी या सामन्याचा सर्वात आकर्षणाची गोष्ट ठरली. त्याच्या गोलंदाजीवर जवळजवळ अर्धा संघ बाद झाला होता. तर या सामन्यात रवींद्र जडेजाने अतंत्य चांगलं क्षेत्ररक्षरण केलं होतं. त्याने केएल राहूलला धावबाद केलं तर 2 चांगले झेल पकडले.

थोडक्यात बातम्या-

सावधान! कोरोना हवेतून पसरतोय; परिस्थिती आणखी गंभीर होणार

उस्मानाबादेत एकाच वेळी 23 जणांवर अंत्यसंस्कार; हृदय पिळवटून टाकणारी दृश्य

भारतासाठी धोक्याचा इशारा, दररोज होऊ शकतो 2320 जणांचा मृत्यू

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महाराष्ट्र सरकार करणार मेगाभरती

कोरोनामुळे घरीच मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं; महाराष्ट्रातील ‘या’ तीन शहरांमध्ये सर्वाधिक घटना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More