बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा”

मुंबई | अमरावतीच्या हरिसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. या प्रकरणात शिवकुमार या आरोपीला पोलिसांनी पळुन जाण्याच्या तयारीत असताना बेड्या ठोकल्या. त्यानंतर महाराष्ट्र सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला आणि टीकेची तोफ डागली. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात आता महत्त्वाची मागणी केली आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं अशी मागणी केली आहे. तसेच विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची या प्रकरणात नियुक्ती करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

तरुण, तडफदार आणि प्रामाणिक वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची इतर कर्मचाऱ्यांवर कशी दमदाटी चालते हे समोर आलं. या प्रकरणात अप्पर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचं निलंबन करण्यात आलं. पण आंदोलन झाल्यानंतर त्यांचं हे निलंबन करण्यात आल्याचं दिसून आलं.

प्रत्येक घटनेमध्ये आंदोलन केल्याशिवाय सरकार कोणताही ठोस निर्णय घेत नाही असा आरोप विरोधी पक्षाने करत या प्रकरणात वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करून चालवण्यात येण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात आता मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

आज राज्यसरकारतर्फे कोरोनासंदर्भात ‘या’ 5 महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता

कोरोना लसीसंदर्भात नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य; केली ‘ही’ मागणी

नियम धाब्यावर बसवुन साताऱ्यात कशी हजारोंच्या संख्येने पार पडली यात्रा, पाहा व्हिडीओ

कोरोना निगेटिव्ह असतांना दिला कोरोना पाॅझिटिव्हचा रिपोर्ट, अन् जिवंतपणीच केलं मृत घोषित

भाजप आमदाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More