‘सभा करायच्याच असतील तर…’; दीपाली सय्यद यांचं राज ठाकरेंना आव्हान
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक हिंदुत्वाचा पवित्रा घेत मशिदींवरील भोंग्यांविरोधात तीव्र भूमिका मांडली. सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत असताना राज ठाकरेंनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली.
राज ठाकरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी राज ठाकरे पुण्यात जाहीर सभा घेणार असून यावरून आणखी एकदा राजकारण रंगायला सुरूवात झाली आहे. राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेवरून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.
सभा करायच्याच असतील तर त्या अयोध्या मध्ये करून दाखवा, असं आव्हान दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना दिलं आहे. पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक देखील सभा घेतात तेही जास्त गर्दी करून, असा खोचक टोला देखील दीपाली सय्यद यांनी लगावला आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे 21 मे रोजी पुण्यात सभा घेणार आहेत. पुण्यातील सभेपूर्वी दीपाली सय्यद यांनी ट्विट करत राज ठाकरेंना डिवचलं आहे. दीपाली सय्यद यांच्या टीकेला मनसे (MNS) काय प्रत्युत्तर देणार हे बघावं लागेल.
सभा करायच्याच असतील तर आयोध्या मध्ये करून दाखवा पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात तेही जास्त गर्दी करून. @ShivSena @RajThackeray @mnsadhikrut
— Deepali Sayed (@deepalisayed) May 17, 2022
थोडक्यात बातम्या-
‘रोहित बाबा…’; रोहित पवारांच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांचा पलटवार
“…तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावू”
राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मुंबई महापौरपद कोणाकडे जाणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं
“…तर मी स्वत: त्याचा हात तोडून त्याच्या हातात देईन”
Comments are closed.