बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावू”

मुंबई | भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी (Smriti Irani) यांच्या पुणे दौऱ्यावरून भाजप (BJP) व महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. पुस्तक प्रकाशनासाठी पुण्यात आलेल्या स्मृती ईराणींविरोधात राष्ट्रवादीने (NCP) जोरदार आंदोलन केलं.

राष्ट्रवादीच्या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर हात उचलल्याने वातावरण अधिकच तापलं. या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया येत असताना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

महिलांवर हात उचलाल तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावू. केंद्रातल्या जर्शी म्हशीला गोबर गॅसची आठवण करून देऊ, अशा तिखट शब्दात दीपाली सय्यद यांनी टीका केली आहे. तर जसे पेराल तसे उगवून देऊ, असा इशारा देखील दीपाली सय्यद यांनी भाजपला दिला आहे.

दरम्यान, दीपाली सय्यद यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी स्मृती ईराणी यांना केंद्रातील जर्शी म्हैस अशी उपमा देत दीपाली सय्यद यांनी टीका केल्याने भाजप व महाविकास आघाडीत वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

 

थोडक्यात बातम्या-

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई महापौरपद कोणाकडे जाणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

“…तर मी स्वत: त्याचा हात तोडून त्याच्या हातात देईन”

रोहित पवारांचा राज ठाकरेंना खोचक सल्ला, म्हणाले…

‘मोराचं लग्न झालं रे…’; मित्राच्या लग्नात मोर बनलेला स्वत:च्या लग्नातही थिरकला, व्हिडीओ पुन्हा व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More