मुंबई | शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayed) सध्या दिल्लीत आहेत. त्या वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेणार आहेत असं त्यांनी सांगितलं. त्या पत्रकारांशी बोलत असताना त्यांना पत्रकारांनी तुम्ही अमित शहांची (Amit Shah) भेट घेणार का?, असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिलीये.
महाराष्ट्रात आधी आणि आता जी राजकीय उलथापालथ झाली त्यात अमित शहांचा मोठा हात असल्याचं त्या म्हणाल्या. त्याचमुळे मी शहा यांची भेट घेणार असल्याचं दिपाली सय्यद यांनी सांगितलं. अमित शहांशिवाय सध्या राजकारण चालत नाही. त्यांच्याकडे जाऊन चर्चा अडकते. प्रत्येकवेळी त्यांनीच राजकारणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे मी सर्वात आधी त्यांना भेटणार आहे.
मागे एकदा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे त्या आता देखील तसेच प्रयत्न करत आहेत. बंडखोरांपैकी कोणीही मी बाळासाहेबांना देव मानत नाही, किंवा मी शिवसैनिक नाही, असं म्हटलेलं नाही. मग अडतंय कुठे? कोणीच पुढाकर घेत नाही. त्यामुळे तो मी घेत आहे, असं दीपाली सय्यद म्हणाल्यात.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची देखील मुलाखत घ्यावी, असं त्या म्हणाल्या. त्यांनी आपण संजय राऊत यांना देखील भेटणार असल्याचं सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या –
“नारायण राणे भाजपने टाकलेल्या तुकड्यांवर जगतात”
‘सत्तेत असो किंवा नसो अजित पवार नेहमी…’, अनिल बोंडेंची बोचरी टीका
‘ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते उपमुख्यमंत्री झाले’, उद्धव ठाकरे म्हणतात…
वाढदिवस उद्धव ठाकरेंचा पण चर्चा होतेय एकनाथ शिंदेंनी दिलेल्या शुभेच्छांची
रक्षाबंधनला भावाकडे जाऊ न शकणाऱ्या बहिणींसाठी खुशखबर! टपाल विभागाचा मोठा निर्णय
Comments are closed.