बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी”

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चांगलीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंचं बंड ते महाराष्ट्रातील सत्तापालट अशा अनेक राजकीय घडामोडी गेल्या काही दिवसात घडल्या. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) मुलाखत घेतली.

सामनाला दिलेल्या या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी त्यांची बाजू मांडली. शिवसेना फुटली यात चूक कोणाची?, धनुष्यबाण कोणाचा?, शिवसेना कोणाची?, महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? अशा अनेक प्रश्नांचं उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. या मुलाखतीनंतर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी राऊतांना सल्ला दिला आहे.

संजय राऊत यांना मी एवढंच सांगेन की उद्धव ठाकरेंप्रमाणे त्यांनी एकनाथ शिंदेंचीही (Eknath Shinde) मुलाखत घ्यावी, असा सल्ला दीपाली सय्यद यांनी राऊतांना दिला आहे. तर त्यांनी ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंची मुलाखत घेत त्यांच्या मनातील गोष्टी बाहेर आणल्या त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी. तसं झालं तर एकत्र येऊन काहीतरी मध्यस्तीचा मार्ग निघेल, असंही दीपाली सय्यद म्हणाल्या.

दरम्यान, मनात असलं तर नाती कितीही फाटली असतील तरी ती पुन्हा व्यवस्थित करता येतात. मला वाटतं कुठेतरी काहीतरी नक्की मार्ग निघेल, असं वक्तव्य देखील दीपाली सय्यद यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आपलेच प्रश्न आपलीच उत्तरं, मुलाखत नाही हा घरचा मामला’; मनसेची तुफान टोलेबाजी

निवडणुकांचा धुरळा उडणार; 236 प्रभागांसाठी ‘या’ दिवशी आरक्षण सोडत होणार जाहीर

तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी!

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

“स्त्रियांना त्यांचं शरीर दाखविण्याचा अधिकार आहे तर पुरूषांना का नाही?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More