“ज्यांच्या हातात आपल्या बायकोचं नियंत्रण नाही, ते…”
मुंबई | शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ज्यांच्या हातात आपल्या बायकोचं नियंत्रण नाही, ते म्हणतात की मी 13 वर्षांचा असताना बाबरी मशीद तोडायला गेलो होतो, असं म्हणत दीपाली सय्यद यांनी फडणवीसांवर टीका केलीये. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
मनसे माझ्या नावाच्या गोष्टीचं किती भांडवल करणार? मनसेकडे फक्त दिपाली सय्यद, सोफिया सय्यद एवढीच गोष्ट आहे का? आजपर्यंत, आत्तापर्यंत मी तशीच आहे, असं त्या म्हणाल्यात.
मी 25 वर्षांचा संसार केलाय. माझा नवरा आहे, एक मुलगा आहे, माझं पूर्ण कुटुंब आहे. माझ्या नवऱ्याची दुसरी किंवा तिसरी कुठलीही बायको नाही, असं दिपाली सय्यद यांनी सांगितलं.
राज साहेबांचं लग्न झालं असतं आणि ते सासरी गेले असते तर त्यांचं नाव बदली झालं असतं की नाही. हे कोणी बनवलं आहे? एखाद्या मुलीचं लग्न झालं की नवरा तिचं नाव बदली करतो हे संस्कार आहेत. त्याचप्रमाणे माझ्या नवऱ्याने माझं नाव लाडाने सोफिया ठेवलं, असं त्या म्हणाल्या.
थोडक्यात बातम्या-
“पूर्वीसारखाच भारत निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”
नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाच्या निर्णयाने खळबळ
कंगनाच्या ‘धाकड’पेक्षा कार्तिकचा ‘भूल भुलैया 2’ सरस, पहिल्या दिवसाची कमाई आली समोर
‘काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे, ही भोकं शिवणार कशी?’; शिवसेनेचा प्रहार
सर्वसामान्यांना धक्क्यावर धक्के! सीएनजी पुन्हा महागलं
Comments are closed.