बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद अडकल्या शिवबंधनात; मतदारसंघही ठरला!

मुंबई |  प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा दिपाली सय्यद यांनी गुरूवारी रात्री शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी दिपाली यांना शिवबंधन बांधलं.

गेल्या दोन दिवसांपासूनच दिपाली सय्यद शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. गुरूवारी रात्री अखेर त्यांनी हाती शिवबंधन बांधून घेऊन राज्यात आणि विधानसभेवर भगवा फडकावण्यासाठी मोठ्या निर्धाराने कामाला लागेल, असा शब्द उद्धव यांना दिला.

दीपाली सय्यद यांचं नाव साकळाई पाणी योजना आंदोलनासाठी संपूर्ण राज्यभर चर्चिलं गेलं. मुख्यमंत्री फडणवीस आणि अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांच्याविरोधात त्यांनी आजाव उठवला.

दरम्यान, दिपाली सय्यद यांना मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवारी देणार आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याशी सय्यद यांना दोन हात करावे लागणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More