मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिदें यांचं बंड सुरू झाल्यापासून अनेकांनी शिवसेना आणि शिंदे गटाने परत एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली होती. अनेकदा कार्यक्रमात ज्यांना यायचं आहे. त्यांनी परत यावं त्यांच्यासाठी शिवसेनेची दारं खुली आहेत, असं अनेक नेत्यांनी म्हटलं. तसेच शिवसेना आणि शिंदे एकत्र यावे अशी इच्छा शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Syed) यांनी बोलून दाखवली होती.
इच्छा फक्त बोलून न दाखवता दिपाली सय्यद यांनी एक पाऊल टाकलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकऩाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. एकनाथ शिंदेनी परत उद्धव ठाकरेसोबत यावं, अशी विनंती केली आहे. यासंबंधी त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्या लिहितात. शिवसेनेच्या आमदारांनो बॅनरवर पक्षप्रमुखांचा फोटो लावल्याने हिंदुत्व कमी होणार नाही. मातोश्रीच्या वाटेला आदरणीय शिंदे साहेबांना घेऊन आलात तर दरवाजे बंद दिसणार नाही. तुम्ही शिवसैनिक मग मातोश्रीला विसरून कामकाज करणार का?, मातोश्रीच्या बैठकीला शहा-फडणवीसांनी येण्याची वाट बघणार का?, असा सवाल केला आहे.
यापूर्वीही शिवसेनेनं शिंदेंची मनधरणी करायचा प्रयत्न केला आहे. त्याचा मात्र काही उपयोग झाला नाही. आता सय्यद यांच्या भेटीनंतर नेमकं काय होणार यावर शिंदे काही निर्णय घेतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
एकनाथ शिदेंच्या बंडानंतर आता शिवसेनेसमोर एक मोठं आव्हान आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी शिवसेनेनं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे .
शिवसेनेच्या आमदारांनो बॅनरवर पक्षप्रमुखांचा फोटो लावल्याने हिंदुत्व कमी होणार नाही. मातोश्रीच्या वाटेला आदरणीय शिंदे साहेबांना घेऊन आलात तर दरवाजे बंद दिसणार नाही.तुम्ही शिवसैनिक मग मातोश्रीला विसरून कामकाज करणार का? मातोश्रीच्या बैठकीला शहा-फडणवीसांनी येण्याची वाट बघणार का?
— Deepali Sayed (@deepalisayed) July 12, 2022
थोडक्यात बातम्या
खळबळजनक! सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीचा मोठा खुलासा
आदित्य ठाकरेंवरील टीकेमुळे किशोरी पेडणेकर संतापल्या, म्हणाल्या…
‘द्रौपदी मुर्मूंकडून दुष्ट प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व’, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
मोठी बातमी! श्रीलंकेत आणीबाणी जाहीर
लस घेतल्याने ‘या’ कॅन्सरचा धोका कमी होणार, अदर पूनावाला यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहित
Comments are closed.