“मनसे पक्ष नसून डिपॅाझिट जप्तची मशिन, सल्ले घेताना हिशोब बघून घ्या”
मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते आणि त्यांचा गट गुवाहाटीला गेले यानंतर राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारने या बंडखोर आमदारांपैकी 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची तयारी सुरु केली. त्याविरोधात शिंदे गटाने सर्वौच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालाने त्यांना दिलासा देत 11 जुलै पर्यंत त्यांना उत्तर देण्याची मुदत वाढवून दिली आहे. त्यात आता त्यांचे महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढून घेण्याचे प्रयत्न आहेत.
शिंदे गटाकडे आता भाजप किंवा मनसेकडे जाऊन सरकार बनवणं असे दोन मार्ग आहेत. या बंडामागे भाजप असल्याचं आरोप महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी केले आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आणि बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्यात गुजरातला गुप्त बैठका झाल्याचं देखील कळते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुद्धा फोनवर चर्चा झालेली असल्याचं वृत्त आहे.
यावर आता अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांचा सल्ला जरा जपून घ्या. मातोश्रीच्या जाचाला आणि राजकारणाला कंटाळून आपण बंडखोरी केली, असं कारण सांगणारे माननीय राज ठाकरे 11 वरुन आता 1 वर आले आहेत. आदरणीय शिंदे साहेब शिवसेनेचे राजकीय गणित नेहमी अधिक असते, वजा नाही. त्यामुळे राजकीय सल्ले घेताना हिशोब करुन घ्या. मनसे हा पक्ष नसून डिपॉझिट जप्त करण्याची मशिन आहे, असा टोला त्यांनी मनसेला लगावलाय.
दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली. त्यांची विचारपूस करण्यासाठी शिंदेंनी फोन केला होता. त्यावेळी त्यांच्यात राजकीय चर्चा देखील झाली. याच कारणावरुन दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य करत सल्ला दिला आहे.
थोडक्यात बातम्या –
राज्यपाल ॲक्शन मोडमध्ये!, पत्र लिहून मागवली ‘ही’ मोठी माहिती
“जनामनाची लाज असती तर राजीनामा दिला असता…”
राज्यात आज काहीतरी होण्याची शक्यता, भाजपने आमदारांना पाठवला ‘हा’ निरोप
सकाळी स्पा, मसाज, जीम; तर रात्री… बंडखोर आमदारांचा दिनक्रम ऐकून चकीत व्हाल!
काळजी घ्या! दारू नाही तर ‘या’ पदार्थांमुळेही होऊ शकतं लिव्हर खराब
Comments are closed.