मुंबई | शिवसेना नेत्या दीपाली सय्यद शिवसेना आणि शिंदे गट एकत्र येण्यासाठी वारंवार आवाहन करत आहेत. दीपाली सय्यद यांनी पुन्हा ट्वीट करत शिवसेना आमदार आणि खासदारांना सल्ला दिला आहे. शिवसेना आमदार खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावं, असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
आमदार खासदारांनी प्रयत्न केले तर अशक्य काहीच नाही, वेळेच्या आगोदर आणि वेळेच्या नंतर काहीच नाही जे आहे ते वेळेवर, अजुनही वेळ गेलेली नाही, राग रूसवे विसरून कुटुंब वाचवा! चर्चा झालीच पाहिजे, असं त्या याआधी म्हणाल्या होत्या.
दिपाली सय्यद यांनी संजय राऊत यांना संयमाचा सल्ला दिला आहे. राऊत त्याचं काम करत आहेत. ते भाजपलाही त्याच पद्धतीने बोलायचे. त्यांची ती शैली आहे. ते बिनधास्त बोलत असतात. त्यामागे त्यांचा हेतू फक्त शिवसेनेला सपोर्ट करायचा असतो, असंही त्या म्हणाल्या होत्या.
दरम्यान, शिवसेनेतील आमदारांच्या भूमिकेनंतर दोन गट पडले आहेत. मात्र, एकाच कुटुंबाची असे गट ही बघवणारी स्थिती आहे. एकाच आधारवडाखाली शिवसेनेचे कार्यकर्ते असणं महत्वाचं आहे. त्यामुळे आता अधिकचा वेळ न जाता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी यावं, असं त्या म्हणाल्या होत्या.
थोडक्यात बातम्या-
सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’ला जाहीर
मोठी बातमी! बंडखोर आमदाराचा उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
’13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर…’; मोदींचं जनतेला आवाहन
“गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात, तुमची तेवढी लायकी नाही”
शिंदे सरकारचा गणेश मंडळांना दिलासा, परवानगी मिळवण्यासाठी ‘ही’ आहे सोपी प्रक्रिया
Comments are closed.