‘घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला’; दीपाली सय्यद यांची पुन्हा राज ठाकरेंवर टीका
पुणे | अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेविरुद्ध भूमिका मांडण्याचं काम सुरु ठेवलं आहे. आजही पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेवर त्यांनी टीका केली आहे.
पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आंदोलन करून जेल मध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपून बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे, अशी बोचरी टीका त्यांनी राज ठाकरेंवर केलीये.
राज ठाकरेंच्या भाषणावर टीका करताना दीपाली सय्यद यांनी घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला, असं म्हणत पुन्हा एकदा राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, पुण्याच्या मेळाव्याला वसंत मोरे यांना खुर्ची मिळेल का हा यांच्या पक्षाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अरे खुर्ची द्याल कि नाही, अशा शब्दात दीपाली सय्यद यांनी काल मनसेवर टीका केली होती.
थोडक्यात बातम्या-
“पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊदसोबत संबंध नाहीत ना?”
‘…म्हणून अयोध्या दौरा स्थगित केला’; राज ठाकरेंनी सांगितलं कारण
‘मी काय कांड करणार?, मला कांड करायचा असता तर…’; सभेआधी वसंत मोरे संतापले
“आता सुरू केलं आहे ना एकदाचा तुकडा पाडून टाका”
माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी; आषाढी वारीची जोरदार तयारी सुरू
Comments are closed.