मुंबई | एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना सोबत घेत बंडखोरी केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदे व शिंदे गटातील बंडखोर आमदार सध्या आसाममधील गुवाहाटी येथे आहेत. यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत बंडखोर आमदारांवर खोचक शब्दात टीका केली आहे. देवा लवकर आटप रे सगळं हॉटेलचं बिल वाढतंय, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे.
विरोधकांचा भाव वाढतोय, EDची नोटीस लाव वाढतोय, शिवसैनिकांच्या मनातील घाव वाढतोय, आमदारांचा ताव वाढतोय, विधिमंडळातील डाव वाढतोय, असंही दीपाली सय्यद म्हणाल्या. तर लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस दाखव रे महाराजा, असं दीपाली सय्यद ट्विट करत म्हणाल्या.
दरम्यान, शिवसेना आता आक्रमक झाली असून बंडखोर आमदारांविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. शिवसेनेकडून 16 बंडखोर आमदारांना नोटीस बजावली असून कारणे दाखवण्यासाठी सोमवारी साडेपाच वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.
देवा लवकर आटप रे हे सगळं, हॅाटेल चे बिल वाढतोय, विरोधकांचा भाव वाढतोय, ED ची नोटीस लाव वाढतोय, शिवसैनिकांच्या मनातील घाव वाढतोय, आमदारांचा ताव वाढतोय, विधिमंडळातील डाव वाढतोय, लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस दाखव रे महाराजा! होय महाराजा! @mieknathshinde
— Deepali Sayed (@deepalisayed) June 25, 2022
थोडक्यात बातम्या-
“…पण त्यांनी शिवसैनिकांच्या आईवर हात घातला आहे, ते कसे शांत राहातील”
“मतं मागायची आहेत तर तुमच्या बापाच्या नावाने मागा, शिवसेनेच्या बापाच्या नावाने नाही”
मोठी बातमी! शिवसेनेला धक्का, शिंदे गटाचे नाव ठरले
बंडखोर आमदारांच्या कुटुंबांची सुरक्षा काढून घेताच एकनाथ शिंदे कडाडले
शिंदे गटाच्या 16 आमदारांवर कारवाई, वाचा कारवाईत कोणाकोणाची नावे
Comments are closed.