बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दीपिका रणवीरचं लॉकडाऊन… पाहा दीपिकाचा रोमँटिक अंदाजातला व्हीडिओ

मुंबई |  देशात लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्य माणसांपासून सर्व कलाकार मंडळी देखील घरातच अडकून पडली आहेत. या लॉकडाऊनच्या काळात कलाकार मंडळी घरात राहून आपल्या जोडीदारासोबत क्वालिटी वेळ घालवत आहेत. दीपिकाने एक व्हीडिओ शेअर करत दीपिका रणवीरचं लॉकडाऊन कसं चाललं आहे याची चाहत्यांना कल्पना दिली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये रणवीर-दीपिकाने किचनमधल्या डिशेसचे फोटो पोस्ट करून चाहत्यांना ‘पाककला’ आम्हालाही येते, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. तर कधी-कधी ते दोघांचे मजेशीर फोटो पोस्ट करत असतात. मात्र आता दीपिकाने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे, त्यामध्ये ती रणवीरला किस करताना दिसून येत आहे.

रणवीर-दीपिका ही जोडी सोशल मीडियावर फारच अ‌ॅक्टीव्ह जोडी म्हणून परिचीत आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ते चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवत असतात. दीपिकाने हा व्हीडिओ पोस्ट केल्याबरोबर चाहत्यांनी या व्हीडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.

दीपिकाने रोमँटिक अंदाजात व्हीडिओ पोस्ट करत ‘दुनिया का सबसे स्कीजेबल चेहरा… क्युटी रणवीर’ असं कॅप्शन दिलं आहे. येणाऱ्या काळात दे दोघे जण ’83’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

 

 

View this post on Instagram

 

World’s Most Squishable Face!!!🌈 #cutie @ranveersingh

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

ट्रेंडिंग बातम्या-

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

आपल्या घामाने महाराष्ट्र घडवणाऱ्या मजुरांचा ठाकरे सरकार छळ करतंय- योगी आदित्यनाथ

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागितली केरळ सरकारकडे ‘ही’ महत्त्वाची मदत

कामगारांच्या मदतीला अभिनेत्री माधुरी दिक्षीत धावली

लग्नाचं आमिष दाखवून ठेवलेले लैंगिक संबंध बलात्कार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More