Deepika Padukone | अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही तिच्या प्रेग्नंसीसाठी सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांआधी दीपिका आणि रणवीर कपूर हे दोघेही एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. त्यावेळी दीपिकाचा बेबी बंप दिसत नव्हता. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी सरोगसी पद्धतीने दीपिका मुल जन्माला घालणार असल्याचं बोललं गेलं. त्यानंतर दीपिका आणि रणवीर हे दोघेही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदानाला गेले. तेव्हा दीपिकाला फेक बेबी बंपवरून ट्रोल करणाऱ्यांना पती रणवीरने चांगलाच मिश्कील टोला लगावला आहे. (Deepika Padukone)
रणवीरने आपल्या इंस्टाग्रामवर दीपिकाचे फोटो शेअर केले होते. तेव्हा दीपिकाने माय सनशाईन असं लिहिलं होतं. या फोटोंमध्ये दीपिकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे. त्यापुढील फोटोवर रणवीरने लिहिलं की, ‘उफ्फ! क्या करू मैं? मर जाऊ?’ तर दीपिकाच्या शेवटच्या फोटोवर त्याने लिहिलं की, ‘बुरी नजर वाले, तेरा मुँह काला!’ रणवीरची ही शेवटची कमेंट्स ट्रोलर्ससाठी असल्याचं म्हटलं जात आहे. (Deepika Padukone)
रणवीरची पोस्ट चर्चेत
दीपिकाने फेब्रुवारी महिन्यात आपल्या प्रेग्नंसीबाबत जगजाहीर केलं आहे. सप्टेंबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असल्याचं तिने म्हटलं होतं. तेव्हापासून दीपिकाचा बेबी बंप पाहण्यासाठी नेटकरी आतूर झाले आहेत. सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान होतं. दीपिका आणि रणवीर सिंह हे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले होते. काहींनी दीपिकाला ट्रोल केलं आहे. अशातच दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावलं आहे. (Deepika Padukone)
दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना फाये डिसुजाचं प्रत्युत्तर
प्रिय सोशल मीडिया.. दीपिका पादुकोण ही तिच्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी बाहेर पडली होती. तिने शरिरावर तिच्या प्रेग्नंसीवर कोणताही फीडबॅक मागवला नव्हता. तुम्हाला तिच्या आयुष्यातील कोणत्याच पैलूंवर टीप्पणी करण्याचा अधिकार नाही. हे थांबवा आणि सुधारा, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. फाये डिसुजाच्या पोस्टला आलियाने लगेचच लाईक केलं होतं. (Deepika Padukone)
मध्यंतरी दीपिका आणि रणवीर सिंह यांच्या नात्यामध्ये वादळ आलं होतं. यांच्या नात्यात घटस्फोटाच्या चर्चा होताना दिसत होत्या. मध्यंतरी रणवीरने दीपिकासोबतचे फोटो डिलीट केले होते. यामुळे आता दोघांमध्ये काही बिनसलं की काय? असा अनेकांना प्रश्न पडू लागला होता. मात्र सध्या दीपिकाच्या बेबी बंपच्या प्रकरणावरून यांच्यातील नातं हे सध्या चांगलं असल्याचं बोललं जात आहे.
News Title – Deepika Padukone Baby Bump On Ranveer Singh Slam To Trollers
महत्त्वाच्या बातम्या
पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त?; जाणून घ्या तुमच्या शहरातील लेटेस्ट दर
आज सूर्यदेवाच्या कृपेने ‘या’ 5 राशींना मोठा धनलाभ होणार!
“कुणीतरी लवकरच रस्त्यावर..”; घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच हार्दिकच्या बायकोची खळबळजनक पोस्ट
घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच नताशाच्या डेटिंगच्या चर्चा; हार्दिक पांड्यापूर्वी कुणाच्या प्रेमात होती?
48 तासांत ‘रेमल’ चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?