Deepika Padukone | बाॅलिवूडमधील कायम चर्चेत असणारी अभिनेत्री दिपीक पदुकोणने आपल्या सौंदर्याने आणि उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. काही महिन्यांपूर्वी दिपीकाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ती आई होणार असल्याची गुड न्यूज तिच्या चाहत्यांसाठी दिली होती. दिपीकाला कधी बाळ होणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं असताना सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्याची सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे.
काय आहे प्रकरण?
काही महिन्यांपूर्वी दिपीका (Deepika Padukone) आणि रणवीर यांनी आई बाबा होणार असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं होतं. दरम्यान आता सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिपीकाने एका गोंडस चिमूकल्याला जन्म दिल्याचं दिसत आहे. याशिवाय रणवीरने देखील या लहान बाळाला आपल्या हातात घेतल्याचं दिसत आहे.
माॅर्फ्ड फोटो व्हायरल?
सोशल मीडियावर (Deepika Padukone) व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे काहीजणांना ही बातमी खरी वाटत आहे. मात्र, हा फोटो फेक असून, या फोटोला मॉर्फ्ड करण्यात आलं आहे. शिवाय या फोटोमध्ये काही तथ्य नाही. मात्र, तरी सुद्धा हा फोटो तूफान व्हायरल झाला आहे. सध्या सोशल मीडियावर या फोटोची चर्चा आहे. दिपीकाने तिच्या अधिकृत अकाउंटवर शेअर केलेल्या बातमीनूसार सप्टेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देणार असल्याचं म्हटलं आहे.
View this post on Instagram
अनंत-राधीकाच्या लग्नात एकत्र-
आपल्या चाहत्यांसाठी दोघे सुद्धा आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन नवनवीन फोटो शेअर करत असतात. दीपिका (Deepika Padukone) आणि रणवीरची फॅन फॉलोइंग सुद्धा वाढताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी रणवीर आणि दीपिका या दोघांनी देखील अनंत- राधीकाच्या लग्नात हजेरी लावली होती.
News Title : deepika padukone fake photo goes viral
महत्त्वाच्या बातम्या-
पुणेकरांनो काळजी घ्या! झिका व्हायरसचा धोका वाढला, रूग्णसंख्या 52 वर
“सरकार आता ‘माझा लाडका घोडा’ योजना आणतंय, मग कुत्रे..”; जितेंद्र आव्हाड यांनी डिवचलं
सर्वसामान्यांना दिलासा! टोमॅटोचे दर अर्ध्यावर, पण इतर भाज्या कडाडल्या
आज शनिदेव ‘या’ राशींवर असणार मेहेरबान; मोठा धनलाभ होणार
लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर करण्यात अदिती तटकरेंचं रायगड आघाडीवर!