दीपिकाचा लेकीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

Deepika Padukone | बाॅलिवूडमधील सर्वाेत्कृष्ट जोडप्यांपैकी दीपिका आणि रणवीर सिंग यांची एक जोडी आहे. ऑनस्क्रिन असो किंवा ऑफस्क्रिन त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. दोघेही सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा दोघे चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांनी आपण आई वडिल होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर या दोघांना एक गोंडस मुलगी झाली. दरम्यान, सोशल मीडियावर दीपिकाच्या मुलीचा फोटो व्हायरल होत आहे.

दुआचा पहिला फोटो-

काही दिवसांपूर्वी दीपिका (Deepika Padukone) आणि रणवीर यांनी त्यांच्या मुलीचं नाव ठेवलं. दुआ पदोकोण सिंग असं तिच्या मुलीचं नाव आहे. त्यानंतर सोशल मीडियावर या रणवीर आणि दीपिकाला ट्रोल करण्यात आलं. या दोघांनी दुआ नावाचा अर्थ सांगितला होता. त्यावेळेस नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल केलं होतं. दरम्यान आता दीपिकाच्या मुलीची पहिली झलक समोर आली आहे.

व्हायरल व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या लाडक्या लेकीबरोबर दीपिका (Deepika Padukone) आणि रणवीर मुंबई एअरपोर्ट दिसले. याचे व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर्सने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये दीपिका आपल्या लाडक्या लेकीला कुशीत घेऊन जाताना दिसली.

व्हिडीओमध्ये रणवीरने दुआबरोबर ट्विनिंग केल्याचं दिसत आहे. दोघांनी फिकट गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले होते. पहिल्यांदाच दीपिका आणि रणवीर आपल्या लाडक्या लेकीबरोबर दिसले. त्यामुळे त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आपल्या चाहत्यांसाठी दोघे सुद्धा आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन नवनवीन फोटो शेअर करत असतात. दीपिका आणि रणवीरची फॅन फॉलोइंग सुद्धा वाढताना दिसत आहे.

News Title : deepika padukone spotted with baby dua

महत्त्वाच्या बातम्या-

राज ठाकरे एकदा मुख्यमंत्री व्हाच! झळकले बॅनर

महायुतीला 80 टक्के मते मिळवून देण्यासाठी कामाला लागा- संभाजी पाटील निलंगेकर

एका झटक्यात झालेल्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेमका काय?

4 दिवसात सोयाबीनला हवा तसा भाव देणार, भाजपच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य

फॉर्म भरुनही पैसे आले नाही त्यांच्यासाठी मोठी अपडेट समोर!