प्रेग्नंसीच्या आठव्या महिन्यातही दीपिकाने केलं असं काही की..; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Deepika Padukone |  बॉलिवूडची मस्तानी म्हणून प्रचलित असणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) नेहमी काही न काही कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती प्रेग्नंट आहे. ती नुकतीच कल्की या सिनेमात झळकली आहे. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, प्रभास या चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसले.दीपिकाला सध्या आठवा महिना सुरू आहे. तिने फेब्रुवारी महिन्यात ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. अशात गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात दीपिकाच्या चालण्यावरून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

सोशल मीडियावर दीपिकाचा (Deepika Padukone) एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये तिने सुंदर पंजाबी सूट घातला आहे. यात तिचा बेबी बंपही सहज दिसून येतोय. मागे दीपिकाला फेक बेबी बंपवरून ट्रोल करण्यात आलं होतं. अशात दीपिकाचा एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये ती एका कार्यक्रमातून बाहेर पडताना दिसून येत आहे.

दीपिकाच्या ‘त्या’ कृत्यावर नेटकरी भडकले

व्हिडिओमध्ये ज्या सहजतेने ती चालते आणि कारमध्ये बसते, ते पाहून नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘प्रेग्नंसीच्या आठव्या महिन्यात ती इतकी सहज कशी चालू शकते’, असा प्रश्न एकाने विचारलाय. तर ‘किती सहजरित्या ती कारमध्ये जाऊन बसली,’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘मी नुकतीच आई झाले. महिला उंच असो, बुटकी असो, जाड किंवा बारिक असो.. तिला गरोदरपणात चालताना थोडा वेळ तर लागतोच. पण दीपिका इतक्या सहजतेने सर्वकाही कसं करतेय’, असा प्रश्न एका यूजरने उपस्थित केला आहे.

दीपिकाचा(Deepika Padukone) हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर नेटकरी आता प्रतिक्रिया नोंदवत आहेत. काही जण तर दीपिकावर चांगलेच संतापले आहेत. काही महिन्यांपुर्वी लोकसभा निवडणुक झाली, तेव्हा रणवीर आणि दीपिका मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले होते.यावेळी पहिल्यांदा दीपिकाचा बेबी बंप बघायला मिळाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

दीपिकाचा व्हिडिओ व्हायरल

तेव्हा देखील दीपिकाला (Deepika Padukone) ट्रोल करण्यात आलं होतं. तेव्हासुद्धा तिचा बेबी बंप न दिसल्याने नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर काहींनी सरोगसीची शक्यता वर्तवली होती. तर, ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान देखील दीपिका हायहिल्समुळे ट्रोल झाली होती.

आता पुन्हा एकदा दीपिका तिच्या चालण्यामुळे ट्रोल झाली आहे. आठवा महिना सुरू असूनही दीपिका इतक्या भरभर कशी काय चालतेय?, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केलाय. दीपिकाचा हा व्हिडिओ आता तूफान व्हायरल झाला आहे.

News Title :  Deepika Padukone Troll by netizens

महत्त्वाच्या बातम्या-

येत्या काही तासांत ‘या’ जिल्ह्यांत दमदार पावसाचा इशारा; यलो अलर्ट जारी

कलकत्ता बलात्कार प्रकरणानंतर अर्जुन कपूरने पुरूषांना दिला महत्वाचा सल्ला!

बहिणींनो! राखी बांधताना फक्त तीन गाठी मारा, काय आहे यामागचं कारण

कंगना रनौतचं महिलांबद्दल खळबळजनक वक्तव्य; म्हणाली, “अशा मुली पुरुषांना..”

“एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण, फडणवीस अर्जुन तर शरद पवार शकुनी मामा”