बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चक्रीवादळामुळं उन्मळून पडलेल्या झाडासमोर अभिनेत्रीचा डान्स; नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं

मुंबई | अभिनेत्री दीपिका सिंहचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत दीपिका भर पावसात उन्मळून पडलेल्या झाडासमोर डान्स करताना दिसतीये. यानंतर दीपिका सिंहला नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. चक्रीवादळात लोकांचे प्राण गमावत असताना नृत्य करणाऱ्या दीपिकावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

मुंबई आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागाला तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. चक्रीवादळामुळं सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं शहरातील बहुतांश भागात मोठे वृक्ष उन्मळून पडले. मात्र अतिवृष्टीमुळे पडलेल्या झाडासमोर दीपिकाने डान्स केला.

नृत्य करण्यासाठी वादळ शमण्याची वाट पाहणं हे आयुष्य नव्हे… आयुष्य म्हणजे पावसात नृत्य करायचा शिकणं…, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं. हा व्हिडीओ पोस्ट करताच तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. दीपिकाचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दीपिकाने नुसता डान्सच नाही केला तर पडलेल्या झाडासोबत तिने खास फोटोशूटही केलं आहे. ‘दीया और बाती हम’ मालिकेतून दीपिका प्रकाशझोतात आली होती. लग्नानंतर संसारात रमली. बाळाच्या जन्मानंतर तिने काही काळासाठी ब्रेकही घेतला होता.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाबद्दल खळबळजनक ट्विट करणाऱ्या डॅाक्टरचा कोरोनानेच घेतला जीव

दिलासादायक! पुण्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

केंद्राकडून गुजरातला एक हजार कोटींचं पॅकेज; वादळातील बळींच्या कुटुंबीयांना 2 लाख रूपयांची मदत जाहीर

‘राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार होणार’; राजेश टोपेंची मोठी घोषणा

कोरोना लसीकरण नियमात मोठे बदल; वाचा सरकारने जारी केलेले नवे नियम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More