जागतिक स्तरावरचा ‘हा’ मान मिळवणारी दीपिका ठरणार पहिली भारतीय अभिनेत्री

मुंबई| सध्या बाॅलिवूडची(Bollywood) आघाडीची अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोनकडं(DeepikaPadukone) पाहिलं जातं. दीपिकानं दमदार अभिनयानं आणि मनमोहक सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. केवळ बाॅलिवूडच नव्हे तर तिनं हाॅलिवूडमध्येही मजल मारली आहे. त्यामुळं तिचे असंख्य चाहते आहेत.

तिचे आतापर्यंतचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. कलाक्षेत्रातील अनेक नामांकित पुरस्काराची ती मानकरी ठरली आहे. त्यातच दीपिकाच्या नावावर आणखी एक रेकाॅर्ड होणार असल्याच्या चर्चा आहेत.

यावर्षीच्या फिफा वर्ल्ड कप ट्राॅफीचे(Fifa World Cup 2022) अनावरण दीपिका पादुकोनच्या हस्ते केले जाणार आहे. त्यामुळं हा मान मिळणारी दीपिका भारताची पहिली अभिनेत्री ठरणार आहे.

फिफा ही फूटबाॅलची जागितक स्तरावराची सगळ्यात मोठी मॅच असते. त्यामुळं दीपीकाला हा जागतिक स्तरावरचा मान मिळणार असल्यानं तिचे चाहतेही प्रचंड खुश आहे.

स्वत: दीपिकानंच यासाठी कतारला जात असल्याची माहिती दिली आहे,अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळं फिफा वर्ल्ड कप ट्राॅफीचे अनावरण करणारी ती पहिली भारतीय महिला कलाकार ठरणार आहे.

दरम्यान, गोल्डन रेशो ऑफ ब्युटी या संस्थेने निवडलेल्या जगातील सर्वात सुंदर स्रियांच्या यादीत देखील तिचं नाव पहिल्या दहामध्ये आहे. या संस्थेने निवडलेल्या सुंदर स्रियांच्या यादीत टाॅप टेनमध्ये असणारी सुद्धा ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली होती.

महत्वाच्या बातम्या-