Top News अहमदनगर

मोठ्या विधवा भावजयीसोबत दीर करणार लग्न; अहमदनगरमधील स्तुत्य घटना

अहमदनगर | सातफेरे घेऊन ती नव्या स्वप्नांसह नव्या घरी आली…लग्नानंतरच्या पुढील आयुष्याच्या प्रवासाला ती आणि तिच्या पतीने सुरुवात केली…सर्व काही सुरळीत सुरु असताना अचानक दुःखाचा भलामोठा डोंगर तिच्यावर कोसळला. एका अपघातात तिच्या पतीचं निधन झालं.

वडाळा बहिरोबा इथल्या प्रांजलीचा 2017 मध्ये महेश मोटे यांच्याशी विवाह झाला. बाळाच्या रूपाने दोघांच्या आयुष्यात अजून एक सुख आलं मात्र महेशच्या अपघाती निधनानंतर त्या आनंदावर विरजण पडलं. प्रांजलीसमोर उभं आयुष्य समोर असताना तिच्या दीराने मानाचा मोठेपणा दाखवत प्रांजलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला.

यासंदर्भात वडाळ्याच्या सरपंच मीनल मोटे, सामाजिक कार्यकर्ते चांगदेव मोटे आणि दत्तात्रय मोटे यांनी विधवा प्रांजलीचे सासरे संजय मोटे यांच्याशी चर्चा केली. यानंतर सासरा, दीर आणि कुटुंबाने आनंदाने हे नवं नातं स्वीकारलंय.

प्रांजलीच्या सासऱ्यांनी वडिलांची भूमिका स्वीकारत विधवा सुनेचे कन्यादान करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 7 जानेवारी 2021 रोजी नात्याने दीर-भावजय असलेले हे दाम्पत्य विवाहबंधनात अडकणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

अक्षय कुमारने वाढवलं मानधन; एका चित्रपटासाठी घेणार ‘इतके’ रूपये

“मी जर तोंड उघडलं तर केंद्रातल्या सरकारला हादरे बसतील”

‘…म्हणून राहुल गांधी इटलीला गेले’; ‘या’ काँग्रेस खासदारानं सांगितलं कारण

रनआऊट दिल्याच्या निर्णयावर कर्णधार अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया, म्हणाला…

बीडच्या तरुणाकडून तरुणीवर कारमध्ये अत्याचार; गजबजलेल्या भागातील घटनेनं औरंबादमध्ये खळबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या