बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किरीट सोमय्यांचा संजय राऊतांना दणका, उचललं ‘हे’ मोठं पाऊल

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) विरूद्ध भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) वाद आता शिगेला पोहोचला आहे. राऊत विरूद्ध सोमय्या वाद आता न्यायालयात पोहोचला असून सोमय्यांनी राऊतांविरोधात मोठं पाऊल उचललं आहे.

किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी संजय राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. शिवडी कोर्टात मेधा सोमय्या यांनी राऊतांविरोधात याचिका दाखल केली आहे.

सोमय्या यांना बदनाम करण्यसाठी राऊतांनी 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याचे खोटे आरोप केल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. किरीट सोमय्यांनी राऊतांविरोधात कारवाईची मागणी केली असून या प्रकरणातील पुढील सुनावणी 26 मे रोजी होणार आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी आम्हाला घाबरवण्यासाठी घोटाळ्याचे आरोप केले असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत. मेधा सोमय्यांनी राऊतांविरोधात मुंबईतील शिवडी कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला असून यावर राऊत काय प्रतिक्रिया देणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल.

 

थोडक्यात बातम्या-

“राजे… डाव ओळखा, हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाहीत”

मोठी बातमी! राजीव गांधींच्या मारेकऱ्याची तब्बल 31 वर्षांनंतर जेलमधून सुटका

मोठी बातमी! मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

मुंडे भावंडांमधील प्रेम पुन्हा एकदा दिसलं; धनंजय मुंडेंनी प्रेमाने पंकजा मुंडेंच्या डोक्यात मारली टपली

देशभर गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट समोर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More