बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपची सरशी, सतीश सावतं यांचा पराभव

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी  बँकेच्या निवडणुकीचा (Sindhudurg State Bank Election) आज निकाल लागणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी प्रकियेस सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल सतीश सावतं यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे सिद्धीविनायक पॅनल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली आहे.

या निवडणूकीत भाजपने सरशी मारल्याचं दिसून येत आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावतं यांचा पराभव झाला आहे. त्याचबरोबर बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी यांनाही पराभव स्विकारावा लागला आहे. सावतं याचा पराभव करत विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या निवडणुकीत आत्तापर्यंत महाविकास आघाडीला 5 आणि भाजपला 9 जागा मिळाल्या आहेत.

या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरस होती. देसाई आणि सावतं दोघांनाही समान मते पडली होती. त्यामुळे शालेय विद्य़ार्थ्याला चिठ्ठी काढायला लावण्यात आली. या चिठ्ठीत भाजपचे विठ्ठल देसाई याचं नाव आलं. त्यामुळे विठ्ठल देसाई यांना विजयी म्हणून घोषीत करण्यात आलं आहे.

दरम्यान, सध्या राज्यात नितेश राणे अटकेवरून राजकारण तापलेलं आहे. नितेश राणे यांच्यावर संतोष परब यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. हे संतोष परब जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावतं यांचे प्रचारप्रमुख आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकारण चिघळण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

पोस्टरबाजी: “नितेश राणे हरवला आहे, शोधून देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस”

‘भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घ्या’; रोहित पवारांची MPSCला विनंती

मोठा झटका! Quinton de Kockची अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

MARD Doctor Strike: कोरोनाचं सावट घोंगावत असताना डाॅक्टरांचा आजपासून संप

गोव्यात राडा: ‘या’ स्टार खेळाडूच्या पुतळ्यावरुन नवा वाद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More