बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुवर्ण पदक हुकलं पण भारतीयांचं ह्रदय जिंकलंस! अंतिम लढतीत रवीकुमार दहियाचा पराभव

टोकियो | टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्व भारतीयांच्या नजरा असलेल्या रवीकुमारचा अंतिम सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे रवीला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. भारताच्या खिशात आणखी एक पदक आलं आहे. भारताचं हे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पाचवे पदक आहे.

दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला रवी कुमार दहियानं कडवी टक्कर दिली. जावुर युगुऐव या कुस्तीपटूने 7-4 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. रवीचा पराभव झाला असला तरी त्याने इतिहास रचला आहे. कारण भारतासाठी रौप्य पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. याआधी भारतासाठी पहिलं रौप्यपदक 2012 साली सुशिल कुमारने आणलं होतं.

भारताचे हे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पाचवे पदक आहे. दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला रवी कुमार दहियानं कडवी टक्कर दिली. मात्र सामन्यात जावुर युगुऐवने गुणांची आघाडी घेत रवीचा पराभव केला.

दरम्यान, रवीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं असलं तरी त्याने धडाकेबाज कामगिरी केली आहे. रवीचं सर्व देशभरातून कौतुक होत आहे.

थोडक्यात बातम्या-

सुवर्ण पदक हुकलं पण भारतीयांचं ह्रदय जिंकलंस! अंतिम लढतीत रवीकुमार दहियाचा पराभव

मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मुंबईप्रमाणे जगभरातही पूरस्थिती, तिथल्या महापालिका आमच्या हातात नाहीत- उद्धव ठाकरे

पुण्यात राष्ट्रीय खेळाडु वैष्णवी ठुबेला मारहाण; रुपाली पाटील म्हणाल्या,कार चालकास अटक करा अन्यथा…

राज्यपालांच्या प्रामाणिक कामामुळे काहींना मळमळ- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More