Maharashtra Vidhan Sabha Result | विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास आता स्पष्ट झालं आहे. महायुती सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. संगमनेर अत्यंत धक्कादायक निकाल लागला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मानल्या जाणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. आठवेळा जिंकल्यानंतर नवव्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात पराभूत झाले आहेत.
थोरात हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. महाराष्ट्रात त्यांना काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या पंक्तित स्थान दिले जाते. याच कारणामुळे राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळालेच तर बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रिपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानले जात आहेत. मात्र मतमोजणीच्या पहिल्याच कलात बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर होते.
बाळासाहेब थोरातांचा एका नवख्या तरूणाने दारूण पराभव केला आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा अमोल खताळ यावेळी जायंट किलर ठरला. अमोल खताळ यांनी थोरातांच्या सत्तेला सुरूंग लावला.
महत्त्वाच्या बातम्या-
मविआचे बडे नेतेही ठरले फेल, पाहा पराभूत उमेदवारांची यादी
“संध्याकाळी मी येतो…”, विजयानंतर फडणवीसांना आला ‘त्या’ खास व्यक्तीचा फोन
सर्वात मोठी बातमी! बच्चू कडू यांचा दारुण पराभव
शरद पवारांना धक्का, कागलमधून हसन मुश्रीफ यांनी उधळला विजयी गुलाल
परळीत धनंजय मुंडेंचीच हवा; धनंजय मुंडेंच्या विजयानंतर जल्लोष